भारतीय हॉकी संघ २०२० वर्षात आपल्या पहिल्या आव्हानासाठी सज्ज झाला आहे. FIH Hockey Pro League स्पर्धेत नेदरलँडविरुद्ध पहिल्या फेरीच्या सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आलेली असून, चिंगलेन साना आणि सुमीत या खेळाडूंनी भारतीय संघात पुनरागमन केलं आहे.

आंतरराष्ट्रीय हॉकी संघाच्या या महत्वाच्या स्पर्धेत हॉकी इंडियाने पहिल्या वर्षी सहभाग घेतला नव्हता. मात्र दुसऱ्या सत्रात भारतीय संघ पदार्पण करणार आहे. १८ आणि १९ जानेवारी रोजी भारत भुवनेश्वरमधील कलिंगा स्टेडीयमवर जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असलेल्या नेदरलँडशी खेळणार आहे.

असा असेल भारतीय हॉकी संघ –

गोलकिपर – पी.आर.श्रीजेश, क्रिशन बहादुर पाठक

बचावफळी – सुरेंद्र कुमार, गुरिंदर सिंह, अमित रोहिदास, रुपिंदरपाल सिंह, हरमनप्रीत सिंह (उप-कर्णधार), बिरेंद्र लाक्रा, कोठाजीत सिंह

मधली फळी – सुमीत, चिंगलेन साना, मनप्रीत सिंह (कर्णधार), विवेक सागर प्रसाद, निलकांत शर्मा

आघाडीची फळी – आकाशदीप सिंह, गुरजंत सिंह, ललित कुमार उपाध्याय, मनदीप सिंह, एस.व्ही.सुनील, गुरसाहीबजीत सिंह