जागतिक क्रमवारीत प्रदीर्घ काळ अव्वल स्थानी राहिलेला मलेशियाचा ली चोंग वेई हा नाकाच्या कर्करोगाने ग्रस्त असूनही ऑलिम्पिक पात्रतेसाठी पुन्हा मैदानावर परतण्याची तो तयारी करीत आहे.

तीन वेळा ऑलिम्पिकचे रौप्यपदक पटकावणारा ली हा सुमारे पाच महिन्यांपासून उपचार घेत असल्याने खेळापासून दूर होता. त्याच्या नाकावरील कर्करोगाचे उपचार सुरू असतानाही तो तंदुरुस्तीसाठी हलकासा व्यायाम करीत आहे.

‘‘तो पुन्हा उत्साहात परतण्याची तयारी करीत आहे,’’ असे मलेशियाचे मलेशियाच्या बॅडमिंटन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष नोरझा झकेरिया यांनी ली याच्याशी दूरध्वनीवरून संवाद झाल्यानंतर सांगितले. कदाचित दोन आठवडय़ांत तो पुन्हा बॅडमिंटनच्या कोर्टवर परतण्याच्या मानसिकतेत आहे. ऑलिम्पिक पात्रतेसाठीच तो तयारी करीत असून आहे. तो अखेरीस गत वर्षी जुलै महिन्यात इंडोनेशियन खुल्या स्पर्धेत खेळला असल्याने सध्या जागतिक क्रमवारीतील त्याचे स्थान १५ पर्यंत घसरले आहे.