22 October 2020

News Flash

ख्रिस गेलला पुत्ररत्न

गेलची जोडीदार नताशा बॅरिज नुकतीच बाळंत झाली असून तिने मुलाला जन्म दिला आहे.

यल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्याला ख्रिस गेलशिवाय मैदानात उतरावे लागणार आहे.

वेस्ट इंडिजचा विस्फोटक फलंदाज ख्रिस गेल बाबा झाला आहे. गेलची जोडीदार नताशा बॅरिज नुकतीच बाळंत झाली असून तिने मुलाला जन्म दिला आहे. नताशा आणि आपल्या नवजात चिमुकल्याला पाहण्यासाठी ख्रिस गेल जमैकाला रवाना झाला आहे. त्यामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्याला ख्रिस गेलशिवाय मैदानात उतरावे लागणार आहे.
दरम्यान, मायदेशी रवाना होताना ख्रिस गेलने विमानातील एक सेल्फी इंस्टाग्रामवर अपलोड केला होता. ‘आय एम ऑन माय वे, बेबी’, असे गेलने सेल्फी अपलोड करताना म्हटले होते. यंदाच्या आयपीएल मोसमात अद्याप ख्रिस गेलची बॅट तळपलेली नाही. दोन सामन्यात त्याला केवळ एकच धाव करता आली. तरीही बंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीने गेलची पाठराखण करत त्याच्या फॉर्मबाबत चिंता करण्याची गरज नसल्याचे स्पष्टीकरण दिले होते. गेल मायदेशी परतल्याने तो दोन सामन्याला मुकणार असून, येत्या २५ एप्रिलला तो पुन्हा संघात दाखल होणार असल्याचे समजते.

I'm on my way, Baby. 😊

A photo posted by KingGayle 👑 (@chrisgayle333) on

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 20, 2016 4:18 pm

Web Title: chris gayle becomes father
टॅग Chris Gayle
Next Stories
1 मुंबई-पुणे संघांचा एक मेचा सामना पुण्यातच, हायकोर्टाची मान्यता
2 कोलकाता अव्वल स्थानी
3 अडखळणाऱ्या मुंबईपुढे बंगळुरूचे आव्हान
Just Now!
X