News Flash

Video : ख्रिस गेलचा हा भन्नाट डान्स तुम्ही पाहिलात का?

एका कार्यक्रमात ख्रिस गेल उपस्थित होता. त्याला व्यासपीठावर बोलावल्यानंतर त्याला डान्स करून दाखवण्याचा आग्रह धरण्यात आला.

‘सिक्सरचा बादशहा’ क्रिस गेल हा त्याच्या फलंदाजीसाठी लोकप्रिय आहे. मैदानावर तो गोलंदाजांना सळो की पळो करून सोडतो. यंदाच्या आयपीएलमध्ये त्याच्यावर कोणताही संघ विश्वास ठेवायला तयार नव्हता. त्यावेळी पंजाबने त्याला विकत घेतले आणि त्याने यंदाच्या हंगामातील पहिले शतक झळकावले. परंतु, मैदान असो की दैनंदिन जीवन. तो नेहमीच आनंदी दिसतो. त्याच्या अशाच ‘जिंदादिल’ स्वभावाची झलक एका कार्यक्रमात प्रेक्षकांना पाहायला मिळाली.

एका कार्यक्रमात ख्रिस गेल उपस्थित होता. त्याला व्यासपीठावर बोलावल्यानंतर त्याला डान्स करून दाखवण्याचा आग्रह धरण्यात आला. आणि त्यानेही लगेचच भांगडा करून प्रेक्षकांची मने जिंकली. या वेळी क्रिकेटपटू शिखर धवन हा देखील या कार्यक्रमात होता. त्यानेही गेलबरोबर ताल धरला. त्यानंतर शिखर धवनने गेलला आपली ‘सिग्नेचर स्टेप’ करून दाखवण्यास सांगितलं. शिक्षणे धवन जेव्हा फिल्डिंग करताना झेल पकडतो, तेव्हा तो आपली मांडी थोपटतो आणि आनंद साजरा करतो. हि स्टेपदेखील गेलने लगेचच करून दाखवली.

हा पहा व्हिडीओ –

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 29, 2018 6:54 pm

Web Title: chris gayle dances with shikhar dhawan at event
Next Stories
1 आता रशीदच्या फिरकीवर टीम इंडियाची ‘कसोटी’
2 सचिन, द्रविडमुळे माझ्या करियरचे झाले ‘हे’ नुकसान – रोहित शर्मा
3 सचिन तेंडुलकरचं एक ट्विट आणि रशीद खान झाला सुपरहिट
Just Now!
X