News Flash

Video : ‘गेल डन!’; नेमबाजीतही गेल सरस… हा व्हिडीओ पाहाच

ख्रिस गेल हा आपल्या फलंदाजीसाठी तर प्रसिद्ध आहेच. पण त्याने नुकतेच आपली नेमबाजीतील प्रतिभाही दाखवली आहे.

वेस्ट इंडिजचा तडाखेबाज फलंदाज ख्रिस गेल हा गोलंदाजांचा कर्दनकाळ म्हणून कायम लोकप्रिय आहे. त्याच्या हाती बॅट आली की तो गोलंदाजांची यथेच्छ धुलाई करतो. गोलंदाजाने फेकलेल्या प्रत्येक चेंडूची कत्तल करण्याच्या आवेशाने तो खेळत असतो. अशा फलंदाजाच्या हाती शॉटगन दिली तर… ख्रिस गेल हा आपल्या फलंदाजीसाठी तर प्रसिद्ध आहेच. पण त्याने नुकतेच आपली नेमबाजीतील प्रतिभाही दाखवली आहे. त्याने हवेत उडवलेल्या लक्ष्याला भेदून आपण नेमबाजीतही प्रवीण असल्याचे दाखवून दिले आहे.

ख्रिस गेलने आपल्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केली आहे. त्या व्हिडिओमध्ये गेल आपल्या हातात शॉटगन घेऊन उभा आहे. एका मशिनमधून एका पाठोपाठ एक असे दोन लक्ष्य हवेत उडवले जात असून तो हवेतच त्या लक्ष्याला भेदत आहे, असे त्या व्हिडिओमध्ये दिसत आहे. हे दोन लक्ष्य हवेत अतिशय वेगाने आणि वाऱ्याच्या दिशेनुसार वळत असते. तसे असताना ख्रिस गेलने त्या लक्ष्याला हवेतच भेदून दाखवले आहे.

हा पहा –

#TopShotta #Smoking #DoubleBang #GoodFun

A post shared by KingGayle (@chrisgayle333) on

हे हवेत उडवण्यात येणारे लक्ष्य साधारणपणे मातीचे बनवण्यात येत असून ते एका मशीनमध्ये टाकले जाते. त्यानंतर एका मागे एक असे दोन लक्ष्य अगदी कमी वेळेच्या फरकाने आकाशात मशीनद्वारे फेकले जाते. तसेच गेलच्या बाबतीत व्हिडीओमध्ये दिसत आहे. पहिल्या लक्ष्याच्या वेळी गेल थोडासा गांगरला असल्याचेही व्हिडिओत दिसत आहे. मात्र त्या नंतर त्याने लक्ष्यभेद केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 7, 2018 2:20 pm

Web Title: chris gayle shotgun target shooting air
टॅग : Chris Gayle,Sports
Next Stories
1 Intercontinental Cup – भारतात फुटबॉल फिव्हर; भारताचे सर्वच्या सर्व सामने ‘हाऊसफुल्ल’
2 न्यूझीलंड क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक माइक हेसन यांचा राजीनामा
3 गट ग : बेल्जियम, इंग्लंडचे पारडे जड
Just Now!
X