वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेल सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर असून तो आपल्या चिमुकल्या मुलीसोबत वेळ व्यतीत करत आहे. व्यस्त वेळापत्रकामुळे ख्रिसला आपली चिमुकली मुलगी ब्लश हिला वेळ देता येत नव्हता. पत्नी गर्भवती असतानाच्या काळात देखील ख्रिस ‘आयपीएल’च्या सामन्यांमध्ये व्यस्त होता. पण आपल्या पत्नीने चिमुकल्या मुलीला जन्म दिल्याची गोड माहिती मिळताच ख्रिस आयपीएलच्या सामन्यांना बगल देऊन मायदेशी परतला होता.

वाचा: बिनधास्त, चौकटीबाहेरचं आत्मचरित्र

गेल सध्या कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये खेळत आहे. वेस्ट इंडिजच्या कसोटीत संघात स्थान न मिळालेल्या गेलने काही दिवसांपूर्वी आपण अद्याप निवृत्त झालेलो नसल्याचे म्हटले होते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून सध्या दूर असल्याने ख्रिसला आपल्या चिमुकल्या मुलीसोबत वेळ व्यतीत करण्याची चांगली संधी उपलब्ध झाली. याचाच फायदा घेत ख्रिस सध्या आपल्या चिमुकलीसोबत जास्तीत जास्त वेळ व्यतीत करतो. नुकतेच ख्रिसने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर चिमुकल्या ब्लशसोबतचे एक छायाचित्र शेअर केले आहे. गेलच्या या छायाचित्राला इंस्टाग्रामवर ३२ हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

I got u #Krissi #UniversalPrincess 🍼

A photo posted by KingGayle 👑 (@chrisgayle333) on