17 July 2019

News Flash

Christchurch mosque shootings : हल्लेखोराने केलं १७ मिनिटांचं LIVE स्ट्रीमिंग

आतापर्यंत ४० जणांचा मृत्यू, २० जण गंभीर जखमी

न्यूझीलंडमध्ये साऊथ आयलँडवरील ख्राइस्टचर्च शहरात शुक्रवारी सकाळी दोन मशीदींमध्ये गोळीबार करण्यात आला. मशिदीत करण्यात आलेल्या या गोळीबारात आतापर्यंत ४० जणांचा मृत्यू झाला असून २० जण गंभीर जखमी झाले असल्याची माहिती न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डर्न यांनी दिली आहे. संध्याकाळच्या प्रार्थनेनंतर जेव्हा मशिदीत गर्दी होती, तेव्हा हा गोळीबार करण्यात आला. हल्ला केल्यानंतर हल्लेखोराने घटनास्थळावरुन पळ काढला होता. महत्वाची बाब म्हणजे या हल्लेखोराने या गोळीबाराचे १७ मिनिटांचे लाईव्ह स्ट्रीमिंगदेखील केले होते.

न्यूझीलंड हेराल्डच्या माहितीनुसार, ऑस्ट्रेलिया पोलिसांनी या युवकाची ओळख पटवली असून हा युवक २८ वर्षाचा आहे. त्याचे नाव ब्रेंटन टॅरॅन्ट (Brenton Tarrant) आहे. या हल्लेखोराने गोळीबाराचे लाईव्ह स्ट्रीमिंग सोशल माध्यमातून केले असल्याने या नावाचे ट्विटर अकाऊंट बंद करण्यात आले आहे. तसेच या व्हिडिओसोबतच त्याने एक लिंकदेखील पोईस्ट केली होती. पण त्याबाबत अधिक माहिती देण्यात आलेली नाही.

गोळीबारानंतर बांगलादेशचा उर्वरित न्यूझीलंड दौरा रद्द

पोलीस आयुक्त माईक बुश यांनी दिलेल्या माहितीनुसार, लाईव्ह स्ट्रीमिंगचे फुटेज हे सोशल माध्यमावर दाखवले जात आहे, याबाबत हल्लेखोराला माहिती होती. हे फुटेज पसरवण्यात येऊ नये आणि व्हिडीओ सोशल माध्यमांतून काढून टाकण्यात यावा, यासाठी पोलीस शर्थीचे प्रयत्न करत आहेत. काहीही झाले तरी हा व्हिडीओ सोशल माध्यमांमध्ये राहू नये, असे प्रयत्न करण्यात येत आहे.

फेसबुक ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड पॉलिसी डायरेक्टर मिया गार्लिक यांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेचे लाईव्ह स्ट्रीमिंग केलेल्याचे व्हिडीओ काढून टाकण्यात आले आहेत. गोळीबाराचे लाईव्ह स्ट्रीमिंग सुरु झाल्यानंतर लगेचच न्यूझीलंड पोलिसांनी ऑस्ट्रेलियाच्या संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर त्या युझरचे फेसबुक आणि इंस्टाग्राम अकाऊंट डिलीट करण्यात आले आणि व्हिडिओदेखील काढून टाकण्यात आला.

दरम्यान, पोलिसांनी ख्राईस्टचर्च येथे गंभीर परिस्थिती निर्माण झालं असल्याचं आपल्या स्टेटमेंटमध्ये सांगितलं आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस पूर्ण प्रयत्न करत आहेत. महत्त्वाचं म्हणजे मशिद अल नूर येथे मोठ्या प्रमाणात मुस्लिम जमलेले होते. यामध्ये बांगलादेश क्रिकेट संघदेखील होता. मिळालेल्या माहितीनुसार, बांगलादेश क्रिकेट संघाचे खेळाडू सुरक्षित आहेत.

First Published on March 15, 2019 1:31 pm

Web Title: christchurch mosque shootings gunman live streamed 17 minutes of shooting in new zealand