News Flash

निवडणुका जवळ आल्यात का? लंकेच्या माजी क्रीडामंत्र्यांच्या आरोपांवर जयवर्धनेचं खोचक उत्तर

२०११ च्या विश्वचषकाचा अंतिम सामना फिक्स असल्याचा माजी क्रीडामंत्र्यांचा दावा

भारत आणि श्रीलंका यांच्यात २०११ साली मुंबईतील वानखेडे मैदानात झालेला विश्वचषकाचा अंतिम सामना फिक्स होता असा आरोप, लंकेचे माजी क्रीडामंत्री महिंदानंद अलुथगमगे यांनी केला होता. ते श्रीलंकेतील News 1st वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. क्रीडामंत्र्यांनी केलेल्या या दाव्यानंतर नवीन चर्चेला सुरुवात झाली आहे. मात्र श्रीलंकेचा माजी खेळाडू आणि २०११ विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात शतक झळकावणाऱ्या महेला जयवर्धनेने या आरोपांची खिल्ली उडवली आहे.

निवडणुका जवळ आल्या आहेत का?? सर्कस सुरु झाल्यासारखं वाटतंय…नावं आणि पुरावे कुठे आहेत?? अशा आशयाचं ट्विट करत जयवर्धनेने माजी क्रीडामंत्र्यांच्या आरोपांवर आपली प्रतिक्रीया दिली आहे.

श्रीलंकेच्या संघाचा तत्कालीन कर्णधार कुमार संगकारानेही क्रीडामंत्र्यांनी केलेल्या दाव्यावर आपली बाजू मांडली आहे. अलुथगमगे यांनी पुरावे द्यावेत म्हणजे या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल. या आरोपांच्या मुळाशी जाऊन चौकशी होणं गरजेचं आहे. त्यामुळे कुठलेही अंदाज बांधण्याच्याआधी या प्रकरणातले पुरावे बाहेर येणं गरजेचं असल्याचं संगकाराने, News 1st वाहिनीशी बोलताना सांगितलं. यानंतर आपल्या ट्विटर हँडलवरही संगकाराने आपली बाजू मांडली.

काय म्हणाले श्रीलंकेचे माजी क्रीडामंत्री??

“२०११ विश्वचषकाचा अंतिम सामना फिक्स होता. मी माझ्या म्हणण्यावर ठाम आहे. मी क्रीडामंत्री असताना हा प्रकार घडला आहे. मी हे खूप काळजीपूर्वक आणि जबाबदारीने सांगतो आहे. पण देशासाठी मी यामध्ये कोणाचाही नाव घेणार नाही. भारताविरुद्ध अंतिम सामना आपण जिंकू शकलो असतो, पण तो फिक्स केला गेला होता. मी यात खेळाडूंना गुंतवू इच्छित नाही. पण काही लोकांनी हा सामना फिक्स करण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावली.”

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 18, 2020 6:10 pm

Web Title: circus has started mahela jayawardene on ex sports ministers claim that sri lanka sold 2011 world cup final psd 91
Next Stories
1 स्वतःच्या खेळात मश्गुल असल्याने सचिन चांगला कर्णधार होऊ शकला नाही !
2 २०११ विश्वचषकाचा अंतिम सामना फिक्स होता, श्रीलंकेच्या माजी क्रीडामंत्र्यांचा खळबळजनक दावा
3 रोहित आणि ‘या’ महिलेचा फोटो व्हायरल; तुम्हाला माहित्येय का कारण?