News Flash

आता खेळा बिनधास्त..

स्पर्धेपूर्वीच गाजलेला फैसलाबाद व्होल्व्हस् आणि कांडुरता मरून्स हे दोन्ही संघ पात्रता फेरीत बाद झाल्याने आता साऱ्यांनाच चॅम्पियन्स लीग ट्वेन्टी-२० स्पर्धेच्या मुख्य फेरीचे वेध लागले आहेत.

| September 20, 2013 12:05 pm

स्पर्धेपूर्वीच गाजलेला फैसलाबाद व्होल्व्हस् आणि कांडुरता मरून्स हे दोन्ही संघ पात्रता फेरीत बाद झाल्याने आता साऱ्यांनाच चॅम्पियन्स लीग ट्वेन्टी-२० स्पर्धेच्या मुख्य फेरीचे वेध लागले आहेत. पात्रता फेरीतील सामन्यांची रंगत संपलेली असली तरी मुख्य फेरीत दाखल झालेल्या सनराजयर्स हैदराबाद आणि ओटॅगो व्होल्टस् या संघांना दडपण न घेता बेधडक खेळ करण्याची संधी असेल. शुक्रवारी हैदराबाद आणि ओटॅगो हे दोन्ही मुख्य फेरीतील संघ भिडणार असून दुसऱ्या सामन्यात फैसलाबाद आणि कांडुरता हे दोन्ही संघ आमनेसामने असतील.
फैसलाबाद आणि कांडुरता या दोन्ही संघांचे आव्हान संपुष्टात आल्याने या सामन्याला अर्थ नसल्याचे म्हटले जात असले तरी या दोन्ही संघांना आपल्या खेळाच्या जोरावर शेवट गोड करण्याची संधी असेल. दुसरीकडे हैदराबाद आणि ओटॅगो यांना मुख्य फेरीसाठी हा सराव सामना ठरू शकतो. हैदराबादचा कर्णधार शिखर धवनसाठी ही आणखी एक खेळी उभारण्याची संधी असेल, तर ओटॅगोचा कर्णधार नॅथन मॅक्क्युलमकडे संघबांधणीच्या दृष्टीने हा सामना महत्त्वाचा असेल. हैदराबाद आणि ओटॅगो या दोन्ही संघांना शुक्रवारच्या सामन्यात प्रयोग करण्याची आणि नवीन खेळाडूंना खेळवण्याची चांगली संधी असेल.
आजचे सामने
१. फैसलाबाद व्होल्स्हस् वि. कांडुरता मरून्स
वेळ : दुपारी ४ वा. पासून
२. सनराजयर्स हैदराबाद वि. ओटॅगो व्होल्ट्स
वेळ : रात्री. ८ वा. पासून
स्थळ : पीसीए स्टेडियम, मोहाली
थेट प्रक्षेपण : स्टार क्रिकेट वाहिनीवर.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 20, 2013 12:05 pm

Web Title: clt20 2013 sunrisers hyderabad otago volts qualify for main draw
Next Stories
1 मुंबई जिल्हा फुटबॉल संघटनेला नव्याने निवडणूका घेण्याचे आदेश
2 उसेन बोल्टचा निवृत्तीच्या विचारात बदल
3 सचिनशी कोणतीही चर्चा केली नाही!
Just Now!
X