01 March 2021

News Flash

पी.व्ही.सिंधू आणि गोपीचंद यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार

महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनच्या वतीने मंगळवारी मुंबईत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदकाची कमाई करणारी बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधू आणि तिचे प्रशिक्षक पी.गोपीचंद यांचा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत आयोजित कार्यक्रमात सत्कार केला.
महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनच्या वतीने मंगळवारी मुंबईत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी मुख्यमंत्र्यांसह राज्याचे क्रीडा व सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे आणि इतर महत्त्वाचे नेते उपस्थित होते. पी.व्ही.सिंधू हिला मुख्यमंत्र्यांनी ७५ लाख रोखरक्कम आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला, तर गोपीचंद यांना २५ लाखांचे बक्षिस देण्यात आले. क्रिकटेतर खेळांमध्येही तरुण पिढी उल्लेखनीय कामगिरीकरून देशाचे नाव जागतिकस्तरावर नेत असताना युवकांमध्ये खेळाप्रतीची भावना जागृत करण्यासाठी राज्यस्तरीय कार्यक्रम हाती घ्यायला हवेत, अशी भावना यावेळी फडणवीस यांनी व्यक्त केली. विविध स्पोट्स क्लब आणि खेळाडूंच्या समन्वयातून खेळाच्या प्रगतीसाठीचे प्रयत्न राज्य सरकार करत राहील, असेही ते म्हणाले. गेली साठ वर्षे आपण फक्त ऐकत आलो, पण आता क्रीडा क्षेत्राचे प्रश्न देखील अतिमहत्त्वाच्या यादीत घेऊन त्यावर त्वरित अंमलबजावणी करण्याची वेळ आली असल्याचेही फडणवीस म्हणाले. महिला कुस्तीपटू आणि रिओमध्ये कांस्य पदकाची कमाई केलेल्या साक्षी मलिक हिला देखील मुख्यमंत्र्यांनी ५० लाखांचे पारितोषिक जाहीर केले. शिवाय तिच्या प्रशिक्षकांचाही गौरव करण्यात येणार असल्याचे सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 6, 2016 7:48 pm

Web Title: cm fadnavis felicitates p v sindhu and her coach p gopichand
Next Stories
1 मला आजही हरभजनची भीतीदायक स्वप्ने पडतात- रिकी पॉन्टिंग
2 सुशील कुमारची पद्मभूषणसाठी शिफारस
3 पाकिस्तानचा संघ २०१९ सालच्या विश्वचषक स्पर्धेला मुकणार?
Just Now!
X