News Flash

चीनच्या अल्ट्रामॅरेथॉनमध्ये २१ स्पर्धकांचा मृत्यू

अरुंद पायवाट असलेल्या डोंगरावर ही शर्यत आयोजित करण्यात आली होती.

बीजिंग : चीनमधील बाययिन शहरात झालेल्या अल्ट्रामॅरेथॉनमध्ये जवळपास २१ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. सोसाटय़ाचा वारा आणि जोरदार पाऊस सोबत वातावरणात झपाटय़ाने झालेला बदल यामुळे १७२ स्पर्धकांपैकी २१ जण मृत्युमुखी पडल्याचे वृत्त झिनहुआ वृत्तसंस्थेने दिले आहे.

अरुंद पायवाट असलेल्या डोंगरावर ही शर्यत आयोजित करण्यात आली होती. शनिवारी स्पर्धकांनी दोन ते तीन हजार मीटरचे अंतर कापल्यानंतर वातावरणात अचानक बदल झाले. स्पर्धक डोंगरावरच अडकल्याने संपूर्ण रात्रभर चाललेल्या बचावकार्याद्वारे तब्बल १५१ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.

तापमान अचानक खाली आल्याने स्पर्धकांना शारीरिक अस्वस्थता जाणवू लागली होती. काही जण धावताना खोल दरीत पडल्याचे सीसीटीव्ही चित्रणावरून दिसून येत आहे. मात्र त्यापैकी किती जण बचावले, याचा शोध घेतला जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 23, 2021 9:09 pm

Web Title: cold weather in china kills 21 in ultramarathon zws 70
Next Stories
1 यूएईत होणार IPLच्या उर्वरित सामन्यांचं आयोजन ?
2 मुंबईकर क्रिकेटर पृथ्वी शॉने ‘त्या’ चुकीसाठी स्वत: सह वडिलांना धरले जबाबदार!
3 फाटलेले शूज आणि नसलेला स्पॉन्सर..! आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूनं सांगितली व्यथा
Just Now!
X