News Flash

कॉलिनचा पदार्पणातच बळींचा षटकार

पदार्पणातच सहा बळी मिळवण्याचा पराक्रम करीत अष्टपैलू कॉलिन डे ग्रँडहोमने क्रिकेट जगताचे लक्ष वेधून घेतले.

| November 19, 2016 02:19 am

पदार्पणातच सहा बळी मिळवण्याचा पराक्रम करीत अष्टपैलू कॉलिन डे ग्रँडहोमने क्रिकेट जगताचे लक्ष वेधून घेतले. कॉलिनच्या या बळींच्या षटकाराच्या जोरावर न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करणाऱ्या पाकिस्तानचा १३३ धावांत धुव्वा उडवला. या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडने पदार्पण करणाऱ्या जीत रावलच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर दुसऱ्या दिवसअखेर ३ बाद १०४ अशी मजल मारली आहे. या पहिल्या कसोटीतील पहिला दिवस पावसामुळे वाया गेला होता.

संक्षिप्त धावफलक

  • पाकिस्तान (पहिला डाव) : ५५.५ षटकांत सर्व बाद १३३ (मिसबाह उल हक ३१; कॉलिन डे ग्रँडहोम ६/४१).
  • न्यूझीलंड (पहिला डाव) : ३६ षटकांत ३ बाद १०४ (जीत रावल खेळत आहे ५५, हेन्री निकोल्स खेळत आहे २९; मोहम्मद अमीर १/१९).

 

डय़ू प्लेसिसचे चेंडू कुरतडण्याचे प्रकरण सामनाधिकाऱ्यांकडे

दुबई : ऑस्ट्रेलियाविरुद्ध नुकत्याच झालेल्या कसोटी सामन्यात चेंडू कुरतडल्याचा आरोप दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फॅफ डय़ू प्लेसिसवर ठेवण्यात आला आहे. डय़ू प्लेसिसला हा आरोप मान्य नसून हे प्रकरण आता सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट यांच्याकडे गेले आहे. टीव्हीच्या पाहणीनुसार मंगळवारी  डय़ू प्लेसिसने थुंकीच्या मदतीने मिंट किंवा गोड पदार्थ चेंडूवर लावल्याचे दिसत आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 19, 2016 2:19 am

Web Title: colin de grandhomme takes 6 wickets for 41 runs on debut
Next Stories
1 ‘तिरक्या’ चालींमुळे खेळाडूंचे नुकसान
2 पी.व्ही.सिंधू चायना सुपर सीरिज स्पर्धेच्या उपांत्यफेरीत
3 …अन् विराट कोहली मैदानातच चेतेश्वर पुजारावर भडकला
Just Now!
X