23 October 2020

News Flash

उद्घाटन सोहळ्याचे प्रक्षेपण वाहिनीद्वारे बेरंग

क्रीडा विश्वाचा मानबिंदू असलेल्या फुटबॉल विश्वचषकाचा उद्घाटन सोहळा गुरुवारी ब्राझीलमधील साओ पावलो स्टेडियमवर रंगला. भारतात विश्वचषकाच्या प्रक्षेपणाचे अधिकार असलेल्या सोनी सिक्स वाहिनीच्या सुमार दर्जाच्या कार्यक्रमांमुळे

| June 14, 2014 03:06 am

क्रीडा विश्वाचा मानबिंदू असलेल्या फुटबॉल विश्वचषकाचा उद्घाटन सोहळा गुरुवारी ब्राझीलमधील साओ पावलो स्टेडियमवर रंगला. भारतात विश्वचषकाच्या प्रक्षेपणाचे अधिकार असलेल्या सोनी सिक्स वाहिनीच्या सुमार दर्जाच्या कार्यक्रमांमुळे भारतीय प्रेक्षकांचा हिरमोड झाला. ‘‘कॅफेरिया’ या कार्यक्रमात तज्ज्ञ म्हणून स्टोक सिटी संघाचा माजी फुटबॉलपटू पीटर क्रोच आणि फ्रान्सचा माजी खेळाडू मिकेल सिल्व्हेस्टर या दुय्यम स्तरातील खेळाडूंचा समावेश करण्यात आला होता. त्यांच्या जोडीला हौशी फुटबॉलपटू आणि बॉलीवूड अभिनेता जॉन अब्राहम अवतरला, पण हा कार्यक्रम प्रभावहीन ठरला.
जत्रा क्रिकेट म्हणून प्रसिद्ध आयपीएलच्या निवेदनांपैकी एक आणि संगीत वाहिनीवर ‘व्हिडिओ जॉकी’ म्हणून वावरणाऱ्या गौरव कपूरला निवेदकाच्या खुर्चीत बसवल्याने चर्चेतून फुटबॉल हा खेळ हरवल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली. जॉन अब्राहमला बाइक्सचे वेड आहे म्हणून या निवेदिकेने त्याला खेळण्यातली एक बाइक भेट म्हणून देण्याचा बालिश प्रकारही प्रेक्षकांना पाहायला मिळाला. क्रोच-सिल्व्हेस्टर द्वयीपेक्षा या त्रिकुटाच्या बडबडीने प्रेक्षकांचा अंत पाहिला. उद्घाटन सोहळा दिवाणखान्यात बसून अनुभवता येणार म्हणून भारतातल्या असंख्य प्रेक्षकांनी गुरुवारी रात्री ११ वाजता टीव्ही लावला. मात्र तासभर उलटला तरी ही सपक चर्चाच कायम राहिल्याने अनेकांनी ट्विटरवरून आपला राग व्यक्त केला तर काहींनी टीव्ही सोडून झोप घेणेच पसंत केले. फुटबॉल विश्वचषकाच्या उद्घाटनासारख्या जागतिक स्वरूपाच्या सोहळ्याचे गांभीर्य लक्षात आले नाही, की काय फज्जा उडू शकतो, याचा प्रत्यय चाहत्यांना या निमित्ताने आला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 14, 2014 3:06 am

Web Title: colorless relay of the opening ceremony of fifa football world cup 2014 by channel
Next Stories
1 गुजरात क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी अमित शाह
2 विश्वचषक हॉकी स्पर्धा : नवव्या स्थानासाठी भारताची द. कोरियाशी झुंज
3 पहिले महायुद्ध!
Just Now!
X