03 March 2021

News Flash

Video: अजब गजब क्रिकेट! खेळाडूने केली ‘भरतनाट्यम’ गोलंदाजी

तुम्ही पाहिलाता का 'हा' मजेशीर व्हिडीओ

क्रिकेटचे जगभरात असंख्य चाहते आहेत. भारतात क्रिकेटला धर्मच मानतात. जवळपास प्रत्येक घरात किमान एक क्रिकेटची बॅट दिसतेच. प्रचंड परिश्रम करून हे खेळाडू आपल्या देशासाठी खेळण्याचं स्वप्न पूर्ण करतात. क्रिकेट हा जसा ऊर्जेचा खेळ आहे तसाच हा विविध स्टाईलचाही खेळ आहे. प्रत्येक क्रिकेटर आपल्या आगळ्या-वेगळ्या शैलीसाठी ओळखला जातो. दिलस्कूप, हेलिकॉप्टर शॉट अशा काही वेगळ्या फटाक्यांनी क्रिकेटपटूंमधील फटक्यांना ओळखलं जातं. गोलंदाजांमध्येही प्रत्येकाची एक वेगळी स्टाईल असते. अशाच एका अजब गजब प्रकारच्या गोलंदाजाचा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.

टीम इंडियाचा सिक्सर किंग युवराज सिंग याने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केला. हा व्हिडीओ नेटकऱ्यांमध्ये चांगलाच व्हायरल होताना दिसतो आहे. युवराजने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये एक गोलंदाज भरतनाट्यमच्या या नृत्याच्या स्टाईलमध्ये ऑफ स्पिन गोलंदाजी करताना दिसत आहे. व्हिडिओ शेअर करत युवीने आपला माजी सहकारी हरभजन सिंहला टॅग केले आहे.

पाहा व्हिडीओ-

 

View this post on Instagram

 

A post shared by Yuvraj Singh (@yuvisofficial)

युवराजने त्या व्हिडीओखाली कॅप्शन लिहिलं, “भरतनाट्यम स्टाईल ऑफ स्पिन!! हरभजन सिंग, तु ही गोलंदाजी पाहून काय म्हणशील?” युवराजने शेअर केलेला हा जबरदस्त व्हायरल झाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 16, 2021 3:15 pm

Web Title: comedy video bharatanatyam style bowling in cricket yuvraj singh post instagram video watch vjb 91
Next Stories
1 सचिनचं हटके ट्विट; करोनाविरूद्धच्या लढ्याची केली भारत-ऑस्ट्रेलिया कसोटीशी तुलना
2 पूर्णपणे बेजबाबदार! गावसकरांनी रोहित शर्मावर व्यक्त केली नाराजी
3 Video: रोहित शर्माने ऑस्ट्रेलियन गोलंदाजाला लगावलेला ‘हा’ चौकार पाहिलात का?
Just Now!
X