27 February 2021

News Flash

Video: अजब गजब विकेट… पुजारा कसा बाद झाला पाहिलंत का?

शांत असणारा पुजाराही 'ते' पाहून प्रचंड चिडला...

पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात इंग्लंडच्या संघाने ५७८ धावांचा डोंगर उभारला. या आव्हानाचा पाठलाग करताना तिसऱ्या दिवसअखेर भारतीय संघाने ६ गड्यांच्या मोबदल्यात २५७ धावांपर्यंत मजल मारली आहे. रोहित शर्मा, शुबमन गिल, विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे हे चार दिग्गज फलंदाज झटपट माघारी परल्यामुळे भारतीय संघ अडचणीत सापडला होता. अशा वेळी ऋषभ पंत आणि चेतेश्वर पुजारा यांनी दमदार फलंदाजी केली. चेतेश्वर पुजाराची विकेट हा दिवसातील चर्चेचा विषय ठरला.

रोहित शर्मा (६), शुबमन गिल (२९), विराट कोहली (११) आणि अजिंक्य रहाणे (१) हे चौघे बाद झाल्यावर संयमी चेतेश्वर पुजारा आणि धडाकेबाज ऋषभ पंत यांनी भारताचा डाव सावरला. पंत आणि चेतेश्वर पुजाराच्या शतकी भागीदारीमुळेच भारतीय संघाला २०० धावांचा पल्ला पार करता आला. चेतेश्वर पुजारा नेहमीपेक्षा जलदगतीने धावा काढत होता. असाच एका चेंडूवर चौकार मारण्याच्या दृष्टीने त्याने फटका मारला. पण दुर्दैव म्हणजे चेंडू सिली पॉईंटच्या खेळाडूच्या हेल्मेटवर आदळला आणि थोडा दूर असलेल्या दुसऱ्या खेळाडूकडे झेल स्वरूपात जाऊन विसावला. गोलंदाज किंवा फिल्डरऐवजी कमनशिबाने पुजाराची विकेट काढली, त्यामुळे नेहमी संयमी असणारा पुजाराही राग व्यक्त करताना दिसला.

पाहा व्हिडीओ-

आणखी वाचा- IND vs ENG व्वा पंत… जिंकलंस!! मैदानात असूनही त्याने केलं असं काही की…

दरम्यान, त्याआधी इंग्लंडचा डाव सर्वबाद ५७८ वर आटोपला. कर्णधार जो रूटचे दमदार द्विशतक हे डावातील विशेष आकर्षण ठरले. त्याला आधी डॉम सिबली आणि बेन स्टोक्स यांच्या अर्धशतकी खेळींची साथ मिळाली. त्यानंतर तळाच्या फलंदाजांनी थोडीफार फटकेबाजी करत संघाला मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचवले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 8, 2021 10:06 am

Web Title: comedy video cheteshwar pujara unfortunate wicket ball hitting fielder helmet and gets caught ind vs eng watch vjb 91
Next Stories
1 …म्हणून अश्विनने घेतली ऋषभ पंतची शाळा
2 IND vs ENG व्वा पंत… जिंकलंस!! मैदानात असूनही त्याने केलं असं काही की…
3 भारत-इंग्लंड कसोटी मालिका : भारत अडचणीत; तळाच्या फलंदाजांवर भिस्त
Just Now!
X