News Flash

Video: हौसेला मोल नाही! चाहत्याने थेट टकलावर घेतली सही अन्…

त्या चाहत्याने नंतर जे केलं ते पाहून व्हाल हैराण...

न्यूझीलंडविरुद्ध पाकिस्तान यांच्यातील दुसऱ्या कसोटीला ३ जानेवारीपासून सुरूवात झाली. या कसोटीच्या तिसऱ्या दिवसअखेर न्यूझीलंडने पहिल्या डावात ३६२ धावांची आघाडी मिळवली. प्रत्युत्तरात दिवसाचा खेळ संपेपर्यंत पाकिस्तान संघाचा दुसरा डाव १ बाद ८ धावांवर थांबला. कर्णधार केन विल्यमसनचं द्विशतक, हेन्री निकल्सचं दीडशतक आणि डेरल मिचेलचं शतक यांच्या जोरावर न्यूझीलंडने पहिल्या डावात ६५९ धावांपर्यंत मजल मारली. आजच्या दिवशीच्या खेळात या तीन खेळाडूंव्यतिरिक्त एका चाहत्याची चर्चा रंगल्याचं दिसून आलं.

न्यूझीलंड क्रिकेट संघाने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला. सामन्यात प्रथम पाकिस्तानी संघाने फलंदाजी केली. यावेळी कायल जेमिसनने ५ बळी टिपले. सामन्याच्या पहिल्याच दिवशी सामना पाहण्यासाठी आलेल्या एका चाहत्याने त्याच्याकडे सही मागितली. चाहत्याने कोणताही पेपर न देता थेट टकलावर जेमिसनची सही घेतली. किस्सा इथेच थांबला नाही. आज सामन्याच्या तिसऱ्या दिवशी तो चाहता पुन्हा मैदानात आला. त्यावेळी तो सुटाबूटात आला होता, पण टकलावरची सही मात्र त्याने तशीच ठेवली होती.

आणखी वाचा- फलंदाज No. 1! केन विल्यमसनच्या एका तडाखेबाज खेळीने मोडले अनेक विक्रम

पाहा व्हिडीओ-

आणखी वाचा- NZ vs PAK: द्विशतक ठोकत विल्यमसनचा विक्रम; पाकिस्तानी गोलंदाजांचा घेतला समाचार

दरम्यान, पाकिस्तानचा पहिला डाव २९७ धावांत आटोपला. अझर अलीने सर्वाधिक धावा केल्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंडने ६ बाद ६५९ वर डाव घोषित केला. विल्यमसनने २३८, निकल्सने १५७ तर मिचेलने नाबाद १०२ धावा केल्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 5, 2021 4:19 pm

Web Title: comedy video cricket fan took autograph on bald head by new zealand bowler kyle jamieson in nz vs pak 2nd test vjb 91
Next Stories
1 सौरव गांगुलीच्या प्रकृतीबाबत रूग्णालय प्रशासनाकडून नवी माहिती
2 NZ vs PAK: द्विशतक ठोकत विल्यमसनचा विक्रम; पाकिस्तानी गोलंदाजांचा घेतला समाचार
3 सचिन की द्रविड? शोएब अख्तरने निवडला आवडता क्रिकेटपटू
Just Now!
X