24 November 2020

News Flash

VIDEO : अबब… असा ‘षटकार’ कधी तुम्ही पाहिलाय का?

अतिशय वेगाने आलेला चेंडू पाहून राशिद खानने बॅट घुमवली अन्...

कॅरेबियन बेटांवर मंगळवारपासून कॅरेबियन प्रिमियर लीग टी२० स्पर्धेला सुरूवात झाली. स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी त्रिनबॅगो नाईट रायडर्स आणि गतविजेता बार्बाडॉस ट्रायडंट्स या संघांनी अनुक्रमे गयाना अमेझॉन वॉरियर्स व सेंट किट्स अँड नेविस पॅट्रियॉट्सचा पराभव केला. बार्बाडोसच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली ती अफगाणिस्तानचा धडाकेबाज खेळाडू राशिद खानने. राशिद खानने नाबाद २६ धावा कुटल्या. सेंट किट्स आणि नेविस पॅट्रियॉट्स विरुद्धच्या सामन्यांत बार्बाडॉसची अवस्था १५ चेंडूत ३ बाद ८ झाली होती. पण नंतर जेसन होल्डर (३८) व मेयर्स (३७) ने डाव सावरला. त्यानंतर मिचेल सँटनर (२०) व राशिद खान (नाबाद २६) यांनी संघाला १५३ धावांपर्यंत मजल मारून दिली.

राशिदने २० चेंडूत २६ धावांची नाबाद खेळी केली. त्यात एक षटकार व २ चौकारांचा समावेश होता. त्याने मारलेला एकमेव षटकार विशेष चर्चेचा विषय ठरला. फलंदाजीस आल्यानंतर पहिल्याच चेंडूवर त्याने हा धडाकेबाज षटकार खेचला. याच षटकाराचा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. अल्झारी जोसेफने टाकलेल्या चेंडूवर राशिदने विचित्र प्रकारे बॅट घुमवली आणि चेंडू टोलवला. विशेष म्हणजे हा आगळावेगळा शॉट चेंडूला थेट सीमारेषेपार घेऊन गेला.

पाहा तो व्हिडीओ-

दरम्यान, या सामन्यात अखेर बार्बाडॉसचा संघ अवघ्या ६ धावांनीच विजयी झाला. या विजयात राशिद खानने मोलाचा वाटा उचलला. त्याने नाबाद २६ धावा तर केल्याच पण त्याचसोबत २७ धावांत २ बळीदेखील टिपले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 19, 2020 7:34 pm

Web Title: comedy video six of rashid khan in awkward style cpl t20 barbados team vjb 91
Next Stories
1 ‘त्या’ कारचा मालक शोधून द्या!; सचिनचं चाहत्यांना आवाहन
2 Dream 11 ची स्पॉन्सरशिप फक्त IPL 2020 पुरतीच – BCCI चा निर्णय
3 माजी क्रिकेटपटूचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Just Now!
X