News Flash

Ind vs Eng Video: भर सामन्यात विराटचं नक्की चाललंय तरी काय?

तुम्ही पाहिलात का विराटचा व्हिडीओ...

इंग्लंडविरूद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवसअखेर भारताने दुसऱ्या डावात एका गड्याच्या मोबदल्यात ५४ धावा केल्या. पहिल्या डावात भारताने ३२९ धावा केल्यानंतर इंग्लंडचा डाव अवघ्या १३४ धावांमध्ये आटोपला. रविचंद्रन अश्विनने पाच बळी घेत पहिल्या डावाअखेर भारताला १९५ धावांची भक्कम आघाडी मिळवून दिली. त्यानंतर दुसऱ्या डावात भारताने दिवसाचा खेळ संपेपर्यंत २४९ धावांची आघाडी मिळवली. आजच्या दिवसाच्या खेळादरम्यान विराट एक मजेशीर गोष्ट करताना दिसला.

Video: इंग्लंडच्या मोईन अलीला प्रेक्षकाने विचारला भन्नाट प्रश्न अन्…

चेन्नईच्या मैदानावर सामना सुरू असून प्रेक्षकांची सामन्याला हजेरी होती. IPLमध्ये चेन्नईच्या सामन्याच्या वेळी ‘व्हिसल पोडू’ असं म्हणत धोनीचे चाहते शिट्टी वाजवून संघांचे मनोबल वाढवत असतात. आज विराटने स्वत:च शिट्टी वाजवायला सुरूवात केली. त्याच्या शिट्टीनंतर चाहत्यांमध्ये ऊर्जेचा संचार झाला आणि सारे चाहते विराटला प्रतिसाद देऊ लागले. BCCIने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

पाहा व्हिडीओ-

Video: हवेत झेप घेत अजिंक्यने घेतलेला भन्नाट झेल पाहिलात का?

दरम्यान, भारताचा पहिला डाव ३२९ धावांवर आटोपल्यानंतर इंग्लंडच्या फलंदाजांनी चाहत्यांची निराशा केली. सलामीवीर रॉरी बर्न्स (०), डॉम सिबली (१६), डॅन लॉरेन्स (९), कर्णधार जो रूट (६) स्वस्तात माघारी परतले. बेन स्टोक्स (१८) आणि ओली पोप (२२) यांनी थोड्या धावा केल्या, पण त्यांनादेखील फार काळ खेळपट्टी सांभाळता आली नाही. त्यानंतर पुन्हा मोईन अली(६), ओली स्टोन (१), जॅक लीच (५) आणि स्टुअर्ट ब्रॉड (०) झटपट माघारी गेले. केवळ नवोदित बेन फोक्सने नाबाद ४२ धावांची झुंजार खेळी केली. अश्विनने ५, अक्षर पटेल आणि इशांत शर्माने २-२ तर मोहम्मद सिराजने १ बळी घेतला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 14, 2021 6:09 pm

Web Title: comedy video virat kohli whistle podu chennai ground ind vs eng 2nd test watch vjb 91
Next Stories
1 अश्विनचा इंग्लंडला दमदार ‘पंच’; दुसऱ्या दिवसअखेर भारत १ बाद ५४
2 IND vs ENG: मॅच सुरू असताना मोदींनी आकाशातून टिपला मैदानाचा फोटो; म्हणाले…
3 What a catch : पंतने घेतलेले दोन्ही झेल पाहून तूम्हीही व्हाल हैराण
Just Now!
X