News Flash

खेळाडूंना सर्वोत्तम सुविधा देण्यासाठी वचनबद्ध – क्रीडामंत्री राजवर्धनसिंग राठोड

राठोड यांनी अ‍ॅथेन्स येथे २००४मध्ये झालेल्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत नेमबाजीत रौप्यपदक मिळवले होते

| September 4, 2017 01:31 am

केंद्रीय क्रीडामंत्री राज्यवर्धन राठोड

आपल्या देशात क्रीडा क्षेत्रासाठी विपुल नैपुण्य उपलब्ध आहे. हे लक्षात घेता भारत हा क्रीडासत्ता बनवण्यासाठी खेळाडूंना सर्वतोपरी सुविधा देण्यासाठी मी कटिबद्ध आहे, असे नवे केंद्रीय क्रीडामंत्री राजवर्धनसिंग राठोड यांनी सांगितले.

राठोड यांनी अ‍ॅथेन्स येथे २००४मध्ये झालेल्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत नेमबाजीत रौप्यपदक मिळवले होते. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या खांदेपालटात विजय गोयल यांच्याकडे असलेले क्रीडा व युवक खाते राठोड यांच्याकडे देण्यात आले आहे.

राठोड पुढे म्हणाले, ‘‘ग्रामीण स्तरापासून ते ऑलिम्पिक स्तरावरील प्रत्येक स्पर्धामध्ये भारताचे खेळाडू पदकविजेते व्हावेत, यासाठी माझा भर राहणार आहे. क्रीडा खाते हा प्रत्येक राज्याचा विषय असतो. साहजिकच प्रत्येक राज्याच्या सहकार्यानेच मला काम करावे लागणार आहे. प्रत्येक खेळाडूपुढे सतत आव्हान असते व ते साध्य करण्यासाठी त्याला अनेक स्तरांवर संघर्ष करावा लागतो. त्याच्या यशाच्या मार्गातील हे अडथळे कमी करण्यासाठी मी काही सकारात्मक बदल करणार आहे.’’

‘‘युवक कल्याण खाते माझ्याकडे असल्यामुळे देशातील युवा पिढीमधील व्यक्तिमत्त्व विकासास कशी चालना मिळेल, या दृष्टीने काही योजना तयार केल्या जातील व त्यांची त्वरित अंमलबजावणी कशी होईल, हे मी पाहणार आहे,’’ असेही राठोड यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 4, 2017 1:31 am

Web Title: committed to give players best facilities says rajyavardhan singh rathore
टॅग : Sports Minister
Next Stories
1 विश्वचषक पात्रता फुटबॉल स्पर्धा : इस्कोचा पराक्रम!
2 दीपिका कुमारी पहिल्याच फेरीत गारद
3 भारताच्या राहुल भारद्वाजला उपविजेतेपद
Just Now!
X