ऑस्ट्रेलियाच्या गोल्डकोस्ट येथे रंगलेल्या राष्ट्रकुल खेळ स्पर्धेत पहिल्या दिवशी भारताने धडाकेबाज सुरुवात केली. भारताच्या गुरुराजा आणि मीराबाई चानू याांनी वेटलिफ्टींग प्रकारात अनुक्रमे रौप्य आणि सुवर्णपदकाची कमाई केली. गुरुराजाने पुनरागमन करत भारताला पहिलं विजेतेपद मिळवून दिलं तर मीराबाईने सहाही संधींचं सोन करत भारताच्या झोळीत सुवर्णपदक टाकलं. सामना संपल्यानंतर मीराबाईने पत्रकारांशी संवाद साधला, यावेळी कोणत्याही वैद्यकीय मदतीशिवाय मीराबाईने देशासाठी ही सुवर्णकामगिरी केल्याचं समोर आलं आहे. या दोन खेळाडूं व्यतिरिक्त कोणत्याही भारतीय खेळाडूला पदक मिळालेले नाही. उद्या अनेक महत्त्वपूर्ण सामने असणार आहेत. त्यामुळे आजच्याप्रमाणेच उद्याही भारतीयांची कामगिरी यशस्वी होईल अशीच आशा चाहत्यांकडून व्यक्त केली जात आहे. आतापर्यंत पदकतालिकेत भारत १ सुवर्ण, १ रौप्य, ० कांस्य मिळवून सातव्या स्थानावर आहे. इंग्लंडने पहिल्याच दिवशी ६ सुवर्ण, ३ रोप्य आणि ३ कांस्य पदकासह पहिल्या स्थानावर आहेत.

  • १७ वर्षीय सर्वात तरुण जलतरणपटू नटराजन उपांत्य फेरीतून बाद
  • राजा मुथुपंडी अंतिम फेरीत सहाव्या स्थानावर
  • ६२ किलो वजनी गटात आणखी एक पदक मिळवण्याची भारताची आशा संपली
  • अंतिम फेरीत पोहचण्याची संधी गेली वाया, भारताची पदकाची आशा मावळली
  • जलतरणमध्ये भारताला धक्का, ५० मी. बटरफ्लाय प्रकारात वीरधवल खाडे उपांत्य फेरीतून बाहेर
  • बास्केटबॉलमध्ये भारतीय महिलांचा पराभव, जमैकाने भारताला ५७-६६ ने हरवलं
  • ६९ किलो वजगी गटात बॉक्सिंगमध्ये भारताचा मनोज कुमार पुढच्या फेरीत
  • स्क्वॅश – दिपीका पल्लीकलची त्रिनीनाद आणि टोबॅगोच्या प्रतिस्पर्ध्यावर मात, पुढच्या फेरीत प्रवेश
  • टेबल टेनिस – भारतीय पुरुषांची आयर्लंडवर मात. ३-० ने जिंकला सामना
  • टेबल टेनिसमध्ये भारतीय महिलांची वेल्सवर ३-१ ने मात
  • पी. व्ही. सिंधू पाकिस्तानविरुद्ध सामन्यात खेळणार नाही
  • टेबल टेनिस सामन्यात भारतीय महिलांचा संघ आघाडीवर
  • आतापर्यंत पदकतालिकेत भारत १ सुवर्ण, १ रौप्य, ० कांस्य
  • मीराबाईने तब्बल १९६ किलो वजन उचलत संपूर्ण स्पर्धेवर आपला दबदबा कायम राखला
  • मीराबाईने आपल्या नावावर असलेला राष्ट्रकुल स्पर्धेचा विक्रम मोडीत काढला
  • पहिल्या दिवशीच्या खेळात भारताला सुवर्णपदक, ४८ किलो वजनीगटात मीराबाईने पटकावलं सुवर्णपदक
  • हरिंदरपाल सिंह विजयी, ११-३, ११-१३, ११-६, ११-८ च्या फरकाने कॅमरुन स्टॅफर्डवर मात
  • स्क्वॅश – भारताच्या हरिंदरपाल सिंह संधूची आपल्या प्रतिस्पर्ध्याला कडवी झुंज
  • त्रिनिनाद टोबॅगोच्या प्रतिस्पर्ध्यांवर केली मात
  • टेबल टेनिस भारताच्या सत्यन गणशेखरन आणि हरमीत देसाईचा दुसऱ्या फेरीत प्रवेश
  • महाराष्ट्राचा वीरधवल खाडे राष्ट्रकुल स्पर्धेत ५० मी. बटरफ्लाय प्रकारात उपांत्य फेरीत दाखल
  • सांघिक प्रकारात भारतीय महिलांकडून श्रीलंकेचा धुव्वा, लंकेवर ५-० ने केली मात
  • १०० मी. बॅकस्ट्रोक प्रकारात पहिल्या फेरीत पाचव्या स्थानावर
  • ५० मी. बटरफ्लाय प्रकारात भारताच्या वीरधवल खाडे आणि सजन प्रकाश अनुक्रमे पाचव्या व सातव्या स्थानावर
  • पहिल्या दिवशी भारताच्या खात्यात पहिलं पदक, गुरुराजाने वेटलिफ्टींग प्रकारात रौप्यपदक
  • बॅडमिंटनमध्ये भारतीय महिला संघाकडून श्रीलंकेचा धुव्वा, ३-० ने भारतीय महिलांचा विजय
  • ५६ किलो वजनी गटात वेटलिफ्टींग प्रकारात भारताच्या गुरुराजाकडून चांगली लढत
  • वेल्सच्या महिला संघाने भारतीय महिलांना ३-२ च्या फरकाने हरवलं
  • हॉकीमध्ये भारताकडून निराशाजनक सुरुवात

अवश्य वाचा – CWC 2018: सलामीच्या सामन्यात भारतीय महिला हॉकी संघाची हाराकिरी