चौथ्या दिवशी भारतीय महिलांनी राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये आपली छाप पाडल्यानंतर पाचव्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झालेली आहे. सकाळच्या सत्रात १०५ किलो वजनी गटात भारताचा वेटलिफ्टर प्रदीप सिंहला रौप्यपदक मिळालं आहे. अतिशय चुरशीच्या झालेल्या सामन्यात, प्रदीपला शेवटच्या संधीत अपयश आल्याने, भारताला आणखी एका सुवर्णपदकावर आपला दावा सांगता आला नाही. याव्यतिरीक्त आज भारतीय खेळाडूंना बॅडमिंटन, टेबल टेनिस, नेमबाजी यांसारख्या स्पर्धांमधूनही पदकाची आशा आहे.

पाचव्या दिवशी भारतीय खेळाडूंच्या कामगिरीचे सर्व अपडेट्स तुम्ही लोकसत्ता.कॉमवर पाहू शकणार आहात.

  • मलेशियावर ३-१ ने मात करत भारताने पटकावलं सुवर्णपदक
  • भारतीय बॅडमिंटन संघाची अंतिम फेरीत मलेशियावर मात, बॅडमिंटन सांघिक प्रकाराचं मिळवलं सुवर्णपदक
  • ४०० मी. शर्यतीत भारताचा मोहम्मद अनस याहीया अंतिम फेरीत
  • १०५ किलो वजनी गटात वेटलिफ्टींगमध्ये भारताचा गुरप्रीत सिंह शर्यतीबाहेर
  • अंतिम फेरीत नायजेरियावर ३-० ने मात करत पटकावलं सुवर्णपदक
  • टेबल टेनिसमध्ये भारतीय पुरुष संघाने गिरवला महिला संघाचा कित्ता
  • वेटलिफ्टींग ९० आणि ९० + वजनी गटात भारताला अपयश, पुर्णिमा पांडे, लच्छिमनी अपयशी
  • स्किट फायनल प्रकारात भारताचा स्मित सिंह अंतिम फेरीत पदकांच्या शर्यतीतून बाहेर
  • बॉक्सिंग – मनिष कौशिक ६० किलो वजनी गटात उपांत्यपूर्व फेरीत दाखल
  • बॉक्सिंग – गौरव सोळंकी ५२ किलो वजनी गटात उपांत्यपूर्व फेरीत दाखल
  • भारताच्या खात्यात आतापर्यंत १६ पदकांचा समावेश
  • मात्र शुट ऑफच्या संधीत सिंगापूरच्या वेलासुची बाजी, मेहुली घोषला रौप्यपदक
  • अखेरच्या संधीमध्ये दोन्ही खेळाडूंचे गुण बरोबर
  • मेहुली घोषचं दमदार पुनरागमन, सिंगापुरी प्रतिस्पर्धी खेळाडूला कडवी टक्कर
  • अंतिम फेरीत अटीतटीच्या सामन्यात अपुर्वी चंदेलाला कांस्यपदक
  • १० मी. एअर रायफल प्रकारात भारताच्या अपुर्वी चंदेला आणि मेहुली घोषची कडवी टक्कर
  • टेबल टेनिसमध्ये भारतीय पुरुषांचं एक पदक निश्चीत, उपांत्य फेरीत भारतीय पुरुषांची सिंगापूरवर ३-२ ने मात
  • जीतू रायने आपला अनुभव पणाला लावत पटकावलं सुवर्णपदक, भारताच्या खात्यात आणखी एक सुवर्णपदक
  • अटीतटीच्या लढाईत ओम मिथरवालला कांस्यपदक
  • जीतू राय आणि ओम मिथरवाल यांची अंतिम फेरीत कडवी टक्कर
  • पुरुषांच्या १० मी. एअर पिस्तुल प्रकारात भारताला दोन पदकांची आशा
  • पदक तालिकेत भारत चौथ्या स्थानावर
  •  अॅथलेटिक्स,  जलतरणपटूंकडून मात्र निराशाजनक कामगिरी
  • आतापर्यंत भारताकडे १३ पदकं, ७ सुवर्ण, ३ रौप्य, ३ कांस्य
  • शेवटच्या संधीत वजन उचलण्यास अपयश आल्याने भारताचं सुवर्णपदक हुकलं
  • पाचव्या दिवसाची सुरुवात रौप्यपदकाने, १०५ किलो वजनी गटात वेटलिफ्टर प्रदीप सिंहला रौप्यपदक