News Flash

राष्ट्रकुल २०१८ – राष्ट्रकुल स्पर्धेत बजरंगाची कमाल, कुस्तीत भारताला आणखी एक सुवर्णपदक

जाणून घ्या आजच्या दिवसातली भारतीय खेळाडूंची कामगिरी

अंतिम फेरीत बजरंगची वेल्सच्या प्रतिस्पर्ध्यावर मात

राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये सलग नवव्या दिवशी भारताने पदकांची लयलूट सुरु ठेवली आहे. नेमबाजी, कुस्ती, बॉक्सिंग यांसारख्या खेळांंमध्ये आज भारतीय खेळाडूंनी पदकं कमावली. महाराष्ट्राच्या तेजस्विनी सावंतने ५० मी. रायफल थ्री पोजीशन प्रकारात सुवर्णपदकाची कमाई करतं भारताचं खातं उघडलं, याच प्रकारात भारताच्या अंजुम मुद्गीलने रौप्यपदक मिळवलं. यानंतर २५ मी. रॅपीड फायर पिस्तुल प्रकारात भारताच्या अनिश भनवालाने सुवर्णपदकाची कमाई केली. अनिश राष्ट्रकुल खेळांमध्ये सुवर्णपदक मिळवणारा भारताचा सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे.

याव्यतिरीक्त कुस्तीत बजरंग पुनियाने सुवर्ण तर पुजा धांडा, मौसम खत्री यांनी रौप्य पदकाची कमाई केली. दिव्या काकरानला, किरण यांना कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं. बॉक्सिंगमध्ये नमन तवंर, मोहम्मद हसीमुद्दीन आणि मनोज कुमार यांनाही उपांत्य फेरीत पराभवाचा सामना करावा लागल्यामुळे कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं. त्यामुळे उर्विरत दिवसांमध्ये भारत किती पदकं मिळवतो याकडे सर्व क्रीडा प्रेमींचं लक्ष असणार आहे.

 • भारतीय बॉक्सर सतीश कुमार ९१ किलो वजनी गटात अंतिम फेरीत पोहोचला असून भारताला आणखी एका सुवर्णपदाकाची संधी आहे.
 • हॉकी संघ आता कांस्यपदकासाठी सामना खेळणार
 • भारतीय पुरुष हॉकी संघाचा उपांत्य फेरीत पराभव, न्यूझीलंडकडून ३-२ ने स्विकारला पराभव
 • बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू उपांत्य फेरीत दाखल
 • बॉक्सर मनोज कुमारच्या खात्यातही कांस्यपदक, बॉक्सर्सकडून कांस्यपदकांची कमाई
 • स्क्वॅश – दिपीका पल्लीकल, सौरव घोष मिश्र दुहेरीच्या अंतिम सामन्यात
 • भारताला बॉक्सिंगमध्ये आणखी एक कांस्यपदक
 • ५६ किलो वजनी गटात भारताचा बॉक्सर मोहम्मद हसिमुद्दीन पराभूत
 • ५-११. ४-११. ५-११ अशा फरकाने गमावले सेट्स
 • अंतिम फेरीत सिंगापूरच्या प्रतिस्पर्ध्याकडून स्विकारावी लागली मात
 • टेबल टेनिस – मनिका बत्रा, मौमा दास जोडीला रौप्यपदक
 • दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूला सुवर्णपदक, मौसम खत्रीला रौप्यपदकावर मानावं लागणार समाधान
 • ९७ किलो वजनी गट फ्रिस्टाईल प्रकारात भारताचा मौसम खत्री अंतिम फेरीत पराभूत
 • कुस्तीत आणखी एका सुवर्णपदकाने भारताला दिला चकवा
 • ६८ किलो वजनी गटात भारताच्या दिव्या काकरानला कांस्यपदक, बांगलादेशी खेळाडूवर केली मात
 • कुस्तीमधून भारताच्या खात्यात आणखी एका पदकाची भर
 • नायजेरियन प्रतिस्पर्धी खेळाडूने केली मात, पुजा धांडाला रौप्यपदक
 • ५७ किलो वजनी गटात भारताची पुजा धांडा अंतिम फेरीत पराभूत
 • अंतिम फेरीत वेल्सच्या प्रतिस्पर्ध्यावर मात करुन पटकावलं सुवर्णपदक
 • ६५ किलो वजनी गटात भारताच्या बजरंग पुनियाला सुवर्णपदक, कुस्तीत भारताचं तिसरं सुवर्णपदक
 • टेबल टेनिस – भारताचा सत्यन गणशेखरन पदकांच्या शर्यतीमधून बाद, अंचता शरथ कमालवर भारताची मदार
 • महिला ट्रॅप नेमबाजीत भारताची श्रेयसी सिंह पदकाच्या शर्यतीमधून बाहेर
 • ९१ किलो वजनी गटात भारताचा बॉक्सर नमन तवंर उपांत्य फेरीतून बाहेर, नमनला कांस्यपदकावर मानावं लागणार समाधान
 • बॉक्सिंग – ६० किलो वजनी गटात भारताचा मनिष कौशिक उपांत्य फेरीत दाखल
 • बॅडमिंटन – सायना नेहवाल उपांत्य फेरीत दाखल
 • २५ मी. रॅपिड फायर पिस्तुल प्रकारात भारताच्या अनिश भनवालाला सुवर्णपदक
 • ५२ किलो वजनी गटात भारताचा बॉक्सर गौरव सोळंकी
 • ४ * ४०० मी. रिले शर्यतीत भारतीय महिलांचा संघ अंतिम फेरीत दाखल
 • ५० मी. रायफल थ्री पोजीशन प्रकारात भारताच्या तेजस्विनी सावंतला सुवर्ण तर अंजुन मुद्गीलला रौप्य पदक
 • नेमबाजीत भारताला आणखी एका सुवर्ण व रौप्य पदकाची कमाई
 • आयोजन समितीचे भारतीय पथकाच्या प्रमुखांना दोन्ही खेळाडूंनी भारतात परत पाठवण्याचे आदेश
 • नियमांचा भंग केल्याप्रकरणी अॅथलिट के. टी. इरफान, राकेश बाबूवर कारवाई
 • नेमबाजी – ५० मी. रायफल थ्री पोजीशन प्रकारात भारताची तेजस्विनी सावंत, अंजुम मुद्गील अंतिम फेरीत
 • ९७ किलो फ्रिस्टाईल वजनी गटात मौसम खत्री अंतिम फेरीत, कुस्तीत भारताची ३ पदकं निश्चीत
 • ६८ किलो वजनी गटात भारताची दिव्या करन दुसऱ्या फेरीत पराभूत, पदकांच्या शर्यतीमधून माघारी
 • ६५ किलो वजनी गटातही भारताच्या बजरंग पुनियाची अंतिम फेरीत धडक
 • ५७ किलो वजनी गटात भारताची कुस्तीपटू पुजा धांडा अंतिम फेरीत

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 13, 2018 7:57 am

Web Title: commonwealth 21st games 2018 schedule time table fixtures venue dates queensland in australia marathi 7
Next Stories
1 भारत सरकारने थकवलं ब्रिटीश कंपनीचं २५० कोटींचं बिल, २०१० कॉमनवेल्थचं केलं होतं कव्हरेज
2 नाटय़मय लढतीत रोनाल्डोने तारले!
3 हे यश पाहण्यासाठी बिराजदार पाहिजे होते!
Just Now!
X