24 November 2020

News Flash

प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मीराबाई, गुरुराजाने पटकावली पदकं

दोन्ही खेळाडूंना वैद्यकीय मदत मिळाली नाही

भारताला सुवर्णपदक मिळवून देणारी मीराबाई चानू

ऑस्ट्रेलियाच्या गोल्डकोस्ट येथे रंगलेल्या राष्ट्रकुल खेळ स्पर्धेत पहिल्या दिवशी भारताने धडाकेबाज सुरुवात केली. भारताच्या गुरुराजा आणि मीराबाई चानू याांनी वेटलिफ्टींग प्रकारात अनुक्रमे रौप्य आणि सुवर्णपदकाची कमाई केली. गुरुराजाने पुनरागमन करत भारताला पहिलं विजेतेपद मिळवून दिलं तर मीराबाईने सहाही संधींचं सोन करत भारताच्या झोळीत सुवर्णपदक टाकलं. सामना संपल्यानंतर मीराबाईने पत्रकारांशी संवाद साधला, यावेळी कोणत्याही वैद्यकीय मदतीशिवाय मीराबाईने देशासाठी ही सुवर्णकामगिरी केल्याचं समोर आलं आहे.

“स्पर्धेदरम्यान माझे वैद्यकीय सहकारी (Physios) माझ्यासोबत हजर नव्हते. स्पर्धेच्या ठिकाणी त्यांना प्रवेश नाकारण्यात आल्यामुळे मला योग्य त्या प्रकारे वैद्यकीय मदत मिळू शकली नाही. मी आयोजकांना माझ्या सहकाऱ्यांना आत सोडण्याची विनंती केली, मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही. त्यामुळे आमच्या संघातील सर्वजण एकमेकांना मदत करत होते”, मीराबाई पत्रकारांशी बोलत होती.

अवश्य वाचा – Mirabai chanu: सहाही संधींचं सोनं! जाणून घ्या मीराबाईच्या ‘सुवर्ण’गाथेची कहाणी

याआधी भारतासाठी रौप्यपदक मिळवलेल्या गुरुराजाने वैद्यकीय पथक सोबत नसल्याचा पुनरुच्चार केला. “माझ्या स्पर्धेदरम्यान मलाही अनेक ठिकाणी दुखापत झाली होती. मात्र फिजीओथेरपिस्ट नसल्यामुळे मला योग्य प्रकारे उपचार घेता आला नाही”. क्रीडा मंत्रालयाच्या नियमांमुळे भारतीय पथकाला पुरेसं वैद्यकीय पथक आणि अन्य सहकाऱ्यांचा चमू ऑस्ट्रेलियाला नेता आला नाहीये. त्यामुळे सामन्यादरम्यान वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसणं ही भारतीय खेळाडूंसाठी गंभीर बाब ठरु शकते असं मत अनेक क्रीडा समीक्षकांनी व्यक्त केलं.

अवश्य वाचा – ….आणि त्या क्षणी मनात पहिल्यांदा देशाचा विचार आला, रौप्यपदक विजेत्या गुरुराजाची प्रामाणिक प्रतिक्रीया

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 5, 2018 3:44 pm

Web Title: commonwealth games 2018 despite no physios mirabai chanu p gururaja shine at gold coast
Next Stories
1 जास्त डोकं चालवू नकोस…काश्मीर प्रश्नावरुन केलेल्या आफ्रिदीच्या वक्तव्याला भारताच्या गब्बरचं सडेतोड उत्तर
2 पॉवर पॅक्ड विजयानंतर मीराबाई चानूवर शुभेच्छांचा वजनदार वर्षाव
3 Mirabai chanu: सहाही संधींचं सोनं! जाणून घ्या मीराबाईच्या ‘सुवर्ण’गाथेची कहाणी
Just Now!
X