राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये सलग दहाव्या दिवशी भारतीय खेळाडूंनी सोनेरी कामगिरी करण्याचा धडाका सुरुच ठेवला आहे. मेरी कोम व गौरव सोळंकीपाठोपाठ भारताच्या संजीव राजपूतने सुवर्णपदकाची कमाई केली आहे.

५० मी. रायफल थ्री पोजिशन प्रकारात अंतिम फेरीत ४५४.५ गुणांची कमाई करत संजीवने हे सोनेरी यश संपादन केलं आहे.

याच प्रकारात भारताच्या चैन सिंहला पाचव्या स्थानावर समाधान मानावं लागलं. २०१४ साली ग्लास्गो राष्ट्रकुल खेळांमधे संजीव राजपूतला कांस्यपदक मिळालं होतं. त्यामुळे संजीवने आपल्या कामगिरीत सुधारणा करत भारताला सोनेरी यश मिळवून दिलं आहे.