News Flash

Commonwealth Games 2018 VIDEO: सचिनचा सुपरफॅन झाला सुपरस्टार

तो म्हणतोय 'रंग दे तिरंगा'

Sudhir Chaudhary
सुधीर कुमार चौधरी

क्रीडाविश्वात खेळाडूंच्या वाट्याला प्रसिद्धी येते. पण, याच खेळाडूंमुळे त्यांचे चाहतेही प्रसिद्ध होतात. असाच एक चाहता म्हणजे सुधीर कुमार चौधरी. काही आठवतंय का? क्रिकेटच्या मैदानात सचिनचं नाव अंगावर रंगवून तिरंग्याच्या रंगात स्वत:ला रंगवून हातात भलामोठा तिरंगा मोठ्या अदबीने घेऊन मैदानात खेळाडूंना प्रोत्साहित करणारा हा सुपरफॅन सुधीर. विविध माहितीपट आणि लघुपटांमधून झळकलेला आणि आपल्या आगळ्यावेगळ्या अंदाजासाठी प्रसिद्ध असणाऱ्या सुधीरला आता एक महत्त्वाची संधी मिळाली आहे. ज्यामुळे तो चाहत्यांच्या दुनियेतला सुपरस्टार झाला असं म्हणायला हरकत नाही.

यंदाच्या वर्षी अवघ्या काही दिवसांवर येऊ घातलेल्या राष्ट्रकुल स्पर्धांच्या प्रमोशनसाठी ‘सोनी पिक्चर्स स्पोर्ट्स नेटवर्क’ने एक अनोखा उपक्रम राबवला आहे. ‘रंग दे तिरंगा’ असं या उपक्रमाचं नाव असून तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सोनी वाहिनीतर्फे एक व्हिडिओ प्रदर्शित करण्यात आला असून सुधीर कुमार चौधरी त्या व्हिडिओमध्ये सर्वांनाच प्रोत्साहित करताना दिसत आहेत.

वाचा : ‘ख्वाबों की शहजादी’ निघून जाते तेव्हा…

सोशल मीडियावर चर्चेत असणाऱ्या या व्हिडिओमध्ये ते क्रिकेटविषयी किंवा फक्त सचिनविषयीच बोलत नसून संपूर्ण देशातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी तो क्रीडारसिकांना विनंती करत आहे. ‘रंग दे तिरंगा’ असं म्हणत सुधीरने राष्ट्रकुल स्पर्धेतील विविध खेळांमध्ये सहभागी झालेल्या भारतीय खेळाडूंच्या चमूला प्रोत्साहन देण्याचं आवाहन सर्वांना केलं आहे. मुळात एक चाहता मिळून आता आणखी किती क्रीडारसिकांना एकत्र आणतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 27, 2018 5:28 pm

Web Title: commonwealth games 2018 watch video sachin tendulkars and indian cricket team superfan sudhir chaudhary face of sonys rang de tiranga campaign
Next Stories
1 राशिद खान बनला क्रिकेट इतिहासातील सर्वांत युवा कर्णधार
2 द्रविड यांची मागणी मान्य; युवा विश्वविजेत्या सहाय्यक मार्गदर्शकांना समान बक्षीस
3 मॉर्नी मॉर्केलचा क्रिकेटला अलविदा
Just Now!
X