News Flash

परिस्थिती आदर्श नाही, पण कोणीही मरत नाहीये ! बांगलादेशी प्रशिक्षकांचं विधान

वाढत्या प्रदुषणामुळे दिल्लीतली हवा दूषित

भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात दिल्लीच्या अरुण जेटली मैदानावर पहिला टी-२० सामना रंगणार आहे. मात्र गेले काही दिवस दिल्लीतलं वाढतं प्रदूषण आणि हवेची खालावलेली पातळी यामुळे सामन्याचं ठिकाण हलवालं अशी सर्वच स्तरातून मागणी होत होती. बांगलादेशचे खेळाडूही दिल्लीत चेहऱ्यावर मास्क लावून सराव करत आहेत. बांगलादेशचे प्रशिक्षक रसेल डोमिंगो यांनीही, दिल्लीतल्या हवामानाबद्दल चिंता व्यक्त केली आहे. मात्र दोन्ही संघासाठी परिस्थिती सारखीच असल्यामुळे हवामानाचा फारसा परिणाम जाणवणार नाही असं विधान केलं आहे.

“दिल्लीतलं हवामान फारसं चांगलं नाहीये. मात्र दोन्ही संघांना सारख्याच वातावरणात सराव करायचा आहे, त्यामुळे आमची तक्रार नाही. मात्र परिस्थिती आदर्श नाही हे मात्र नक्की!! पहिल्या सामन्यासाठी अधिकाधीक सराव करणं हेच आमच्या हातात आहे. काही खेळाडूंना डोळ्यात जळजळ होतेय, काहींचा घसा खवखवतोय पण परिस्थिती नियंत्रणात आहे. कोणीही आजारी नाहीये किंवा कोणीही मरत नाहीये.” पहिल्या सामन्याआधी डोमिंगो यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

दिल्लीतला सामना दुसऱ्या ठिकाणी हलवावा अशी मागणी केल्या काही दिवसांपासून होत होती. मात्र बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी सामन्याच्या वेळेत कोणताही बदल होणार नसल्याचं स्पष्ट केलं, यानंतर संभ्रमावर पडदा पडला आहे. त्यामुळे पहिल्या सामन्यात कोणता संघ बाजी मारतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अवश्य वाचा – पहिल्या टी-२० सामन्याआधी भारतीय गोटात चिंता, कर्णधार रोहितला दुखापत

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 1, 2019 5:52 pm

Web Title: condition is not ideal but no one is dying says bangladesh coach russell domingo psd 91
Next Stories
1 पहिल्या टी-२० सामन्याआधी भारतीय गोटात चिंता, कर्णधार रोहितला दुखापत
2 Video : शॉट खेळला पण क्रीजमध्ये यायलाच विसरला… पहा विचित्र ‘रन आऊट’
3 दिया मिर्झा बीसीसीआयवर भडकली, जाणून घ्या कारण…
Just Now!
X