फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेमुळे भारतात या खेळासाठी अत्यंत पोषक वातावरण निर्माण झाले आहे. टीव्हीवरील सामने पाहणाऱ्या चाहत्यांमध्येही भारतीयांनी उच्चांक करताना पाचवे स्थान प्राप्त केले आहे. यावरूनच आपल्या देशातही फुटबॉलज्वर निर्माण झाला होता, हे स्पष्ट झाले आहे. या खेळाच्या विकासाकरिता अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. आता गरज आहे ती त्याचा फायदा घेत खेळाचा तळागाळापर्यंत विकास करण्याचीच, असेच मत अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे सचिव कुशल दास, वेस्टर्न इंडिया फुटबॉल संघटनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हेन्री मेनेझिस व ज्येष्ठ आंतरराष्ट्रीय खेळाडू षण्मुगम व्यंकटेश यांनी व्यक्त केले.

ब्राझीलमध्ये झालेल्या फिफा विश्वचषक स्पर्धेचा आनंद आपल्या देशातील कोटय़वधी लोकांनी घेतला आहे. त्यामुळे हा खेळ घराघरांत पोहोचण्यास मदत झाली आहे. या अनुकूल स्थितीचा फायदा घेत भारताची या खेळातील प्रगती अधिक चांगल्या रीतीने करण्याची जबाबदारी आमच्यावर आली आहे. ही स्पर्धा सुरू असतानाच भारताचा क्रिकेट सामनाही सुरू होता, मात्र प्रसारमाध्यमांनीही आमच्या खेळाला अधिक प्रसिद्धी दिली आहे. या खेळासाठी प्रायोजक मिळविण्याबाबत आता अडचणी येणार नाहीत. इंडियन सुपर लीग, आय-लीग यांच्यासारख्या विविध स्पर्धासाठी अनेक उद्योग संस्था आपणहून आम्हास मदत करण्यास तयार झाल्या आहेत. आम्ही २०१७ मध्ये १७ वर्षांखालील गटाची विश्वचषक स्पर्धा आयोजित करणार आहोत. त्यासाठी आम्हाला उद्योग क्षेत्राच्या सहकार्याची गरज भासणार आहे. फिफा विश्वचषक स्पर्धेमुळे या स्पर्धेलाही आम्हाला चांगले प्रायोजक मिळणार आहेत. त्या दृष्टीने सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.
– कुशल दास, अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे सचिव

आजपर्यंत केवळ क्रिकेटला सहकार्य करणारे अनेक सेलिब्रेटिज आमच्या खेळाकडे वळू लागले आहेत, ही फिफा विश्वचषक स्पर्धेचीच किमया आहे. विश्वचषक स्पर्धेमुळे महाराष्ट्रातील फुटबॉल क्षेत्रात सकारात्मक बदल निर्माण होत आहेत. टाटा, महिंद्रा यांच्याबरोबरच अनेक अन्य उद्योग संस्थाही या खेळासाठी मदत करण्याकरिता पुढे येत आहेत. आपल्या देशात १७ वर्षांखालील गटाची विश्वचषक स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. या स्पर्धेकडे गांभीर्याने पाहण्याची आवश्यकता आहे. जर ब्राझील वरिष्ठ गटाची विश्वचषक स्पर्धा यशस्वीरीत्या आयोजित करू शकतो तर आपणही भविष्यात या स्पर्धेचे आयोजन करू शकतो, असा आत्मविश्वास ब्राझीलच्या संघटकांनी आम्हाला दिला आहे. १७ वर्षांखालील गटाच्या स्पर्धेच्या संयोजनपदाबरोबरच विजेतेपद कसे मिळविता येईल, याचा विचार करण्याची गरज आहे. गेल्या सात-आठ वर्षांमध्ये आपल्याकडे फुटबॉलच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा निर्माण झाल्या आहेत. इंडियन सुपर लीग, आय-लीग अशा अनेक स्पर्धाचे आयोजन होत आहे. त्याचा फायदा घेत आंतरराष्ट्रीय स्तरावरील अव्वल दर्जाचे खेळाडू घडविण्याची गरज आहे.
– हेन्री मेनेझिस, वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनचे सीईओ