03 March 2021

News Flash

स्पेन, उरुग्वे उपांत्य फेरीत

विश्वविजेत्या स्पेनने साखळी फेरीतील अखेरच्या सामन्यात नायजेरियाचा ३-० असा सहज पाडाव करत ‘ब’ गटात अव्वल स्थान पटकावून कॉन्फेडरेशन चषकाची उपांत्य फेरी गाठली आहे.

| June 24, 2013 06:13 am

विश्वविजेत्या स्पेनने साखळी फेरीतील अखेरच्या सामन्यात नायजेरियाचा ३-० असा सहज पाडाव करत ‘ब’ गटात अव्वल स्थान पटकावून कॉन्फेडरेशन चषकाची उपांत्य फेरी गाठली आहे. २०१०चा विश्वविजेता स्पेन आणि २००६चा विश्वविजेता इटली यांच्यात २७ जूनला मध्यरात्री कॉन्फेडरेशन चषकाची उपांत्य लढत रंगणार आहे. उरुग्वेने दुबळ्या ताहितीचा ८-० असा धुव्वा उडवत उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले.
अंतिम चार जणांमध्ये स्थान मिळवण्यासाठी विन्सेंट डेल बॉस्के यांच्या प्रशिक्षकपदाखालील स्पेनला अवघ्या एका गुणाची आवश्यकता होती. मात्र जॉर्डी अल्बाचे दोन गोल आणि ६२व्या मिनिटाला फर्नाडो टोरेसने हेडरद्वारे केलेल्या गोलमुळे स्पेनने नायजेरियाचे आव्हान सहज परतवून लावत सलग तिसऱ्या विजयाची नोंद केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 24, 2013 6:13 am

Web Title: confederations cup 2013 round up
Next Stories
1 चॅम्पियन्स करंडक विजयी भारतीय संघावर बीसीसीआयची अर्थवृष्टी
2 नायजेरियाला चमत्काराची अपेक्षा!
3 राणे, राऊत, शिर्के, आथरे यांचा भारतीय संघात समावेश आशियाई अ‍ॅथलेटिक्स स्पर्धा
Just Now!
X