19 November 2019

News Flash

Ind vs WI : भारताने मालिका जिंकली, मात्र ट्रोल झाले राहुल गांधी

भारतीय संघाचा चुकीचा उल्लेख करणं पडलं महागात

भारत विरुद्ध विंडीज यांच्यातील 2 कसोटी सामन्यांची मालिका भारताने जिंकून कसोटी क्रमवारीत आपलं अव्वल स्थान कायम राखलं. या विजयानंतर सोशल मीडियावर सर्वत्र भारतीय संघावर अभिनंदनाचा वर्षाव होऊ लागला. मात्र यावेळी काँग्रेस पक्षाच्या आयटी सेलने भारतीय संघाच्या अभिनंदनाचं केलेलं ट्विट सोशल मीडियावर चेष्टेचा विषय बनलं आहे.

वास्तविक ‘मेन इन ब्ल्यू’ ही संकल्पना भारतीय वन-डे संघाशी निगडीत आहे. कारण वन-डे सामन्यांमध्ये भारतीय संघाची जर्सी ही निळी आहे. मात्र काँग्रेसने केलेल्या ट्विटमुळे सोशल मीडियावर नेटीझन्सी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी व पक्षाला चांगलंच ट्रोल केलं आहे.

First Published on October 15, 2018 9:00 pm

Web Title: congress trolled for congratulating the men in blue after they won a test match
Just Now!
X