News Flash

भारताबाहेर विश्वचषकाचे आयोजन सोयीस्कर -चॅपेल

विश्वचषक अन्य ठिकाणी खेळवणे शक्य नसल्यास किमान तो पुढे ढकलण्यात यावा.

| May 10, 2021 02:02 am

नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) १४वा हंगाम स्थगित केल्यामुळे भारतातील असुरक्षितता स्पष्ट झाली. त्यामुळे ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धाही भारताऐवजी अन्य ठिकाणी खेळवावी किंवा तसे शक्य नसल्यास विश्वचषक पुढे ढकलण्यात यावा, असा सल्ला ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार इयान चॅपेल यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (आयसीसी) दिला आहे.

चार खेळाडूंसह संघ व्यवस्थापनातील सदस्यांना करोनाची लागण झाल्यामुळे ४ मे रोजी ‘आयपीएल’ स्थगित करण्यात आली. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यात भारतात होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या आयोजनाबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

‘‘आयपीएल स्थगित केल्यामुळे भारतातील सद्य:स्थिती कशी आहे, याचा सर्वाना आढावा घेता आला. येत्या काही महिन्यांत तेथील परिस्थिती सुधारेल, अशी आशा आहे, परंतु तसे न झाल्यास भारतातच विश्वचषकाचे आयोजन करणे धोक्याचे ठरेल. त्यामुळे ‘आयसीसी’ने पर्यायी योजना तयार ठेवावी,’’ असे चॅपेल म्हणाले.

‘‘मात्र विश्वचषक अन्य ठिकाणी खेळवणे शक्य नसल्यास किमान तो पुढे ढकलण्यात यावा. भारतातील स्थिती सुधारल्यावर उपलब्ध तारखांमध्ये विश्वचषकाचे आयोजन करावे, जेणेकरून सर्व संघ स्पर्धेत सहभागी होतील आणि त्यांच्या सुरक्षिततेलाही धोका नसेल,’’ असेही चॅपेल यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 10, 2021 2:02 am

Web Title: convenient to host t20 world cup outside india says ian chappell zws 70
Next Stories
1 इंग्लिश प्रीमियर लीग फुटबॉल: मँचेस्टर सिटीचे जेतेपद लांबणीवर
2 “भारत ही एक अशी जागा आहे, जिथे…”, मुंबई इंडियन्सच्या ट्रेंट बोल्टची पोस्ट व्हायरल
3 मातृदिन : सचिनसह ‘स्टार’ क्रिकेटपटूंनी मानले आपल्या आईचे आभार
Just Now!
X