News Flash

न्यूझीलंडचा कोरी अँडरसन निवृत्त, आता अमेरिकेकडून खेळणार

३६ चेंडूत झळकावलं होतं अर्धशतक

न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू कोरी अँडरसन यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहिर केली आहे. यापुढे कोरी अँडरसन न्यूझीलंड संघाकडून खेळताना दिसणार नाही. मागील दोन वर्षांपासून अँडरसन एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळू शकला नाही. अँडरसनची प्रेयसी अमेरिकन आहे. त्यामुळे निवृत्तीनंतर त्यानं अमेरिकेा टी 20 लीगमध्ये खेळण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे २९ वर्षीय अँडरसन यापुढे कदाचीत अमेरिका संघाकडून आंतरराष्ट्रीय सामन्यात खेळू शकतो.

न्यूझीलंडसाठी प्रतिनिधित्व केलं ही माझ्यासाठी गर्वाची बाब आहे. मला अद्याप खूप क्रिकेट खेळायचं होत पण काही गोष्टींमध्ये शक्य नाही झालं. न्यूझीलंड क्रिकेटने माझ्यासाठी जे काही केले त्याचे मी कौतुक करतो ‘ अशी पहिली प्रतिक्रिया एंडरसनने निवृत्तीनंतर क्रिकबझला दिली.

अँडरसनने ४९ एकदिवसीय, ३० टी २० आणि १३ कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने एकदिवसीय सामन्यात एक हाजर १०९ धावा काढल्या आहेत. तर टी-२० मध्ये २८५ आणि कसोटीमध्ये ६८३ धावा केल्या आहेत. एकदिवसीय सामन्यात अँडरसनने न्यूझीलंडकडून सर्वात वेगवान शतक झळकावण्याचा विक्रम केला आहे. त्यानं फक्त ३६ चेंडूत शतकी खेळी केली होती. दरम्यान, अँडरसनने अमेरिकेत होणाऱ्या टी 20 स्पर्धेसाठी खेळण्याचा निर्णयासोबतच तीन वर्षांचा करार केला असल्याची माहिती आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 5, 2020 3:44 pm

Web Title: corey anderson quits international cricket for new zealand play usa nck 90
Next Stories
1 जाडेजाच्या दुखापतीवर मांजेरकरांचे प्रश्नचिन्ह; नियमाचं उल्लंघन केल्याचा आरोप
2 सचिनसाठी आजची तारिख आहे खास; जाणून घ्या का?
3 पराभवानंतर ऑस्ट्रेलियाला आणखी एक मोठा धक्का
Just Now!
X