News Flash

टी २० विश्वचषक आयोजनावर करोनाचं सावट; बीसीसीआयची नवी रणनिती

बीसीसीआयचा प्लान 'B'

देशात करोनाचं संकट अधिक गडद होत चाललं आहे. लसीकरणाचा वेग मंदावल्याने करोना रुग्णांच्या संख्येतही वाढ होत आहे. त्यात आयपीएल स्पर्धेचं बायोबबलमध्ये आयोजन करण्यात आलं आहे. स्पर्धा सुरु होण्यापूर्वी काही खेळाडूंना करोनाची लागण झाली होती. तर काही खेळाडूंनी करोनाच्या भीतीपोटी स्पर्धेतून माघार घेतली आहे. त्यामुळे आता आयसीसी टी २० विश्वचषकाचं आयोजन कसं करणार? असा प्रश्न बीसीसीआयला पडला आहे. त्यासाठी या विश्वचषकाचं आयोजन युएईला ठेवण्याचा विचार बीसीसीआयने केला आहे.

या वर्षी १८ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर दरम्याना आयसीसी टी २० विश्वचषक स्पर्धा आहे. मात्र करोना स्थिती पाहता हे आयोजन संकटात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे बीसीसीआयनं प्लान बी तयार ठेवण्याची तयारी केली आहे. बीसीसीआयचे जनरल मॅनेजर धीरज मल्होत्रा यांनी बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत ही माहिती दिली.

करोनामुळे IPL सोडण्याचा निर्णय घेतला, पण मायदेशी नाही जाऊ शकले पंच पॉल रॅफेल; आता…

‘या स्पर्धेसाठी माझी डायरेक्टर म्हणून नियुक्ती केली आहे.आपल्या देशात विश्वचषकाचं आयोजन व्हावं यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आमचं करोना स्थितीवर लक्ष आहे. या स्थितीवर आम्ही आयसीसीशी बोलत आहोत. तसेच आम्ही यूएईत स्पर्धेचं आयोजन करण्याची रणनिती आखत आहोत. मात्र यावर बीसीसीआय अंतिम निर्णय घेईल’, असं बीसीसीआयचे जनरल मॅनेजर धीरज मल्होत्रा यांनी सांगितलं आहे.

IPL 2021: ‘या’ महागड्या खेळाडूंना अजून एकही संधी नाही

मागच्या वर्षी करोना स्थितीमुळे बीसीसीआयनं आयपीएलचं आयोजन यूएईत केलं होतं. ईसीबीसोबत करार करण्यात आला होता. त्यामुळे टी २० विश्वचषकाचं आयोजन करण्यास कोणतीही अडचण येणार नाही,असं बीसीसीआयचं अधिकाऱ्यांचं मत आहे. मागच्या वर्षी करोनामुळे ऑस्ट्रेलियात होणारी विश्वचषक स्पर्धा रद्द करण्यात आली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 30, 2021 5:00 pm

Web Title: corona impact may be on t 20 world cup bcci new strategy rmt 84
Next Stories
1 करोनामुळे ‘शूटर दादी’ फेम चंद्रो तोमर यांचं निधन
2 IPL 2021: ‘या’ महागड्या खेळाडूंना अजून एकही संधी नाही
3 ‘या’ खेळाडूंनी आयपीएलच्या पहिल्या षटकात ठोकल्या सर्वाधिक धावा
Just Now!
X