News Flash

बॉक्सिंग संघाच्या डॉक्टरला करोना

लवकरच सुरू होणारे सराव शिबीर रद्द होण्याची शक्यता

संग्रहित छायाचित्र

पतियाळा येथे भारताच्या बॉक्सिंग संघासोबत असणारे डॉक्टर अमोल पाटील यांना करोना झाला आहे. त्यांना करोना झाल्याने भारताच्या संघातील सहभागी ११ खेळाडूंची करोना चाचणी करण्यात आली. मात्र त्यात त्या खेळाडूंना करोना नसल्याचे सिद्ध झाले आहे.

चाचणी करण्यात आलेल्या खेळाडूंमध्ये जागतिक स्पर्धेतील रौप्य पदक विजेता अमित पांघलचाही समावेश आहे. या सर्व खेळाडूंना विलगीकरणात राहण्यास सांगण्यात आले आहे. त्यांची पुन्हा करोना चाचणी घेण्यात येणार आहे. मात्र करोनाबाधित रुग्ण आढळल्याने लवकरच सुरू होणारे सराव शिबीर रद्द होण्याची शक्यता आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 14, 2020 12:10 am

Web Title: corona to the boxing team doctor abn 97
टॅग : Coronavirus
Next Stories
1 Umpire’s Call बाबत पुनर्विचार करा, सचिन तेंडुलकरची आयसीसीला विनंती
2 गॅब्रियलचा भेदक मारा! केली २० वर्षातील सर्वोत्तम कामगिरी
3 विराटने केलं इंग्लंडला धूळ चारणाऱ्या वेस्ट इंडिजचं कौतुक, म्हणाला…
Just Now!
X