30 September 2020

News Flash

IPL 2020 : ‘राजस्थान रॉयल्स’चा सदस्य करोना पॉझिटिव्ह

युएईला जाण्याआधी केलेल्या चाचणीत निदान

Coronavirus in IPL 2020 : राजस्थान रॉयल्सचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक दिशांत यागनिक यांना करोनाची लागण झाली आहे. त्यांनी केलेल्या करोना चाचणीचा अहवाल सकारात्मक आला आहे. IPL 2020 चे आयोजन युएईमध्ये १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या कालावधीत होणार आहे. यासाठी काही दिवसांतच प्रत्येक संघ युएईला रवाना होणार आहे. पण त्याआधीच राजस्थान रॉयल्सला धक्का बसला आहे.

आमच्या संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक दिशांत यागनिक यांची कोविड -१९ चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. संघाकडून घेण्यात आलेल्या अतिरिक्त चाचणीत त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आढळला आहे. संघाच्या इतर सर्व सदस्यांचीही चाचणी झाली असून त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे”, असे फ्रँचायझीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

“राजस्थान रॉयल्सचा क्षेत्ररक्षण प्रशिक्षक दिशांत यागनिक याची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. युएईच्या उड्डाणासाठी संघाच्या सदस्यांना पुढील आठवड्यात मुंबईत एकत्र येणे आवश्यक आहे, हे लक्षात ठेवून ही चाचणी घेण्यात आली. बीसीसीआयने शिफारस केलेल्या दोन चाचण्यांव्यतिरिक्त सर्व खेळाडू, सहाय्यक कर्मचारी आणि युएईला जाणाऱ्या संघ व्यवस्थापन सदस्यांची अतिरिक्त चाचणी घेण्यात आली. त्यात यागनिक यांचा अहवाल पॉझिटिव्ह आढळला”, असेही निवेदनात म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 12, 2020 3:03 pm

Web Title: coronavirus in ipl 2020 rajasthan royals fielding coach dishant yagnik tests positive for covid 19 vjb 91
टॅग Coronavirus
Next Stories
1 मुंबईकर क्रिकेटपटूची गळफास घेऊन आत्महत्या
2 संजय दत्तला फुफ्फुसाचा कॅन्सर, युवराजने दिला खास संदेश
3 मनोज तिवारीचा रिया चक्रवर्तीला अप्रत्यक्षरित्या टोला; म्हणाला…
Just Now!
X