01 October 2020

News Flash

भारतीय हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंग करोना पॉझिटिव्ह

मनप्रीत सिंगसोबत अन्य तीन खेळाडूंना करोनाची लागण

Image Courtesy: Manpreet Singh Twitter

भारतीय हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंगला करोनाची लागण झाली आहे. मनप्रीत सिंगसोबत अन्य तीन खेळाडूंना करोनाची लागण झाली आहे. बंगळुरुत राष्ट्रीय शिबीर पार पडणार असून त्यात सहभागी होण्याआधीच मनप्रीत सिंग करोना पॉझिटिव्ह आढळला आहे. पीटीआयने यासंबंधी वृत्त दिलं आहे.

मनप्रीत याच्यासह डिफेंडर सुरेंद्र कुमार, जसकरण सिंग आणि ड्रॅग फ्लिकर वरुन कुमार यांना करोनाची लागण झाली आहे. भारतीय क्रीडा प्राधिकरणाने मनप्रीत सिंगच्या वतीने स्टेटमेंट प्रसिद्द केलं आहे. “मी स्वत:ला भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या कॅम्पसमध्ये क्वारंटाइन केलं आहे. अधिकाऱ्यांनी परिस्थिती चांगल्या प्रकारे हाताळल्याचा मला आनंद आहे. लवकरच प्रकृची चांगली होईल असा मला विश्वास आहे,” असं मनप्रीतने म्हटलं आहे.

बंगळुरु येथे पार पडलेल्या राष्ट्रीय हॉकी शिबीरात मनप्रीत आणि इतर खेळाडू सहभागी झाले होते. तेथून परतल्यानंतर चाचणी केली असता त्यांना करोनाची लागण झाली असल्याचं समोर आलं. याआधी हे सर्व खेळाडू लॉकडाउन जाहीर झाल्याने सेंटरमध्येच अडकले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 7, 2020 7:41 pm

Web Title: coronavirus india hockey captain manpreet singh and three other players test positive sgy 87
टॅग Coronavirus
Next Stories
1 IPL 2020 : विराटसोबत खेळण्याबाबत फिंच म्हणतो…
2 …म्हणून ३७व्या वर्षीही हा खेळाडू खेळतोय क्रिकेट
3 IPL 2020 : मोठ्या विश्रांतीनंतर धोनी सरावासाठी मैदानात
Just Now!
X