करोना विषाणूचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने संपूर्ण देशभरात ३ मे पर्यंत लॉकडाउन वाढवलं. विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारी यंत्रणा वारंवार सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचं आवाहन करत आहेत. मात्र लॉकडाउनचा फटका बसलेला कामगार वर्ग अजूनही आपल्या राज्यात परत जाण्याच्या प्रयत्नात आहे. मुंबईतील वांद्रे स्थानकाबाहेर मंगळवारी संध्याकाळी अशाच पद्धतीने हजारो कामगारांचा मोठा जमाव एकत्रित आलेला दिसला. लॉकडाउनचा विरोध करत हे कामगार आपल्या गावी जाण्यासाठी हटून बसले होते. गावी जाण्यासाठी गाडी सोडण्याची मागणी हे कामगार करत होते. त्यावेळी पोलिसांनी वेळेवर घटनास्थळावर येत सौम्य लाठीमार करून जमाव पांगवला.

“किराणा मालाची दुकानं उघडा, पण क्रिकेट खेळू नका”

महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांनी घडलेल्या प्रकाराबद्दल केंद्र सरकारला दोषी धरलं. केंद्र सरकार परराज्यातील मजुरांना त्यांच्या गावी जाण्यासाठी योग्य निर्णय घेत नाहीये. या कामगारांना सध्या निवारा आणि अन्नाची गरज नसून त्यांना आपल्या गावाला जायचं आहे, अशा आशायचे ट्विट करत आदित्य ठाकरे यांनी सरकारला दोषी ठरवलं.

पाकिस्तानी क्रिकेटपटू म्हणतो, “कुंबळे मला मोठ्या भावासारखा…”

या साऱ्या प्रकारानंतर भारताचा फिरकीपटू हरभजन सिंग याने या प्रकरणावर सडेतोड मत मांडले. “सगळ्यांना घरात सुरक्षित ठेवायचं असेल तर त्यासाठी संचारबंदी हाच योग्य पर्याय आहे. वांद्रे येथील गर्दीचे प्रकरण हे खूपच अयोग्य होतं. नागरिकांना अजूनही समज येत नाही. त्यांना परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आलेले नाही. ते स्वत:चे आणि इतरांचे जीव धोक्यात घालत आहेत”, असे हरभजनने ट्विट केले. त्या पोस्टमध्ये त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आदित्य ठाकरे यांनाही टॅग केलं.

पंतप्रधान मोदींनंतर आफ्रिदीचे आणखी एका भारतीयावर टीकास्त्र, म्हणाला…

Coronavirus : क्रीडाविश्व शोकाकुल! माजी क्रिकेटपटूची करोनाशी झुंज अपयशी

दरम्यान, मुंबई पोलिसांनी कारवाई करत या प्रकरणी उत्तर भारतीय संघटना अध्यक्ष विनय दुबे याला मंगळवारी रात्री अटक केली.

कोण आहेत विनय दुबे?

विधानसभा निवडणुकीमधील पराभवानंतर आणि शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत घरोबा केल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदुत्त्वाची कास पकडून धार्मिकदृष्ट्या उजव्या राजकारणाच्या दिशेने पाऊल टाकले. मात्र आपली प्रखर उत्तर भारत विरोधी ओळख काहीशी मवाळ करून लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस आणि आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आघाडीची चाचपणी करण्यासाठी राज ठाकरे यांनी डिसेंबर २०१८ मध्ये उत्तर भारतीयांच्या एका मेळाव्याला संबोधित केले होते. या मेळाव्याचे संयोजक वांद्रे गर्दी प्रकरणी अटक करण्यात आली असलेले विनय दुबे हेच होते.

उत्तर भारतीय महापंचायतीचे अध्यक्ष असलेले दुबे हे तसे मूळचे उत्तर प्रदेशातील भदोहीचे आहेत. आपलं बरंच शिक्षण मराठीत झालं असल्याचे सांगणारे दुबे हे ऐरोलीला राहतात. त्यांचा ई-कॉमर्स वेबसाईटना तांत्रिक सहाय्य देण्याचा व्यवसाय आहे. ३४ वर्षांचे दुबे हे राजकारणामध्ये तसे नवखे नाहीत. २०१२ च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांमध्ये दुबे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे उत्तर मतदारसंघातून शड्डू ठोकला होता. पण त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले.

मागील आठवड्यातच दुबे यांचे वडील जटाशंकर यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना भेटून कृतज्ञता म्हणून रुपये पंचवीस हजार इतक्या रकमेचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधी करिता सुपूर्द केला होता. जटाशंकर हे गेली पंचवीस वर्ष रिक्षा चालक म्हणून काम करत आहेत.