News Flash

पाक क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षांची भारताविषयी दर्पोक्ती, म्हणाले…

भारताला आणि BCCI टोलादेखील लगावला...

करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सध्या सर्व जगभरात क्रीडा स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. बीसीसीआयनेही २९ मार्चपासून सुरु होणारी आयपीएल स्पर्धा आता अनिश्चित काळासाठी स्थगित केली आहे. IPL स्पर्धा रद्द झाल्यास बीसीसीआयला अंदाजे ३ हजार कोटी रुपयांचं नुकसान होणार आहे. याचसोबत सामन्यांचं प्रक्षेपण करणारी स्टार स्पोर्ट्स वाहिनी आणि प्रत्येक संघमालकांनाही याचा मोठा आर्थिक फटका बसणार आहे. त्यामुळे यंदाचे IPL वर्षाअखेरीस होणाऱ्या आशिया चषकाचे आयोजन रद्द करण्याच्या चर्चा रंगल्या आहेत. त्यावर, IPL साठी आशिया चषक रद्द करू देणार नाही, असे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष एहसान मणी यांनी म्हटले होते. त्यातच आता मणी यांनी भारताबाबत अधिक रोखठोक मत व्यक्त केले आहे.

भारत-पाक क्रिकेटवरून अख्तरचा सुनील गावसकरांवर पलटवार

“भारताविरूद्ध क्रिकेट न खेळण्यामुळे आपल्याला (पाकिस्तान) नुकसान होईल हे खरं आहे, पण आम्ही आता त्याबाबत विचार करत नाही. सध्या तरी ही छोटीशी गोष्ट आहे. जर भारत-पाक क्रिकेट सुरू होत नसेल, तर काही हरकत नाही. आपल्याला त्यांच्याशिवाय राहावं लागेल. पण एक नक्की की आपल्याला जगण्यासाठी भारताची गरज नाही”, अशी दर्पोक्ती एहसान मणी यांनी केली.

Video : भारतीय महिला क्रिकेटपटूचा धमाकेदार डान्स पाहिलात का?

वांद्रे प्रकरण : आदित्य ठाकरेंना टॅग करून हरभजनचं सडेतोड मत

“भारत अविश्वासू आहे. आपण त्यांच्यावर क्रिकेट संबंधांसाठी अवलंबून राहू शकत नाही. नजीकच्या भविष्यकाळात तरी ते शक्य आहे असं मला वाटतं नाही. जर तसं झालं तर चांगलंच आहे. ICC च्या स्पर्धांमध्ये आपण त्यांच्याशी खेळतो, तेवढं पुरेसं आहे. आम्ही राजकारण आणि क्रिकेट वेगळं ठेवतो”, असा टोलाही त्यांनी लगावला.

“किराणा मालाची दुकानं उघडा, पण क्रिकेट खेळू नका”

दरम्यान, सध्या करोनाशी लढण्यासाठी भारत-पाक मालिकेतून निधी उभारावा असा प्रस्ताव पाकिस्तानच्या काही खेळाडूंकडून देण्यात येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 16, 2020 10:58 am

Web Title: coronavirus lockdown extended pakistan cricket board president ehsan mani slams india and bcci says we dont need them amid covid 19 crisis vjb 91
टॅग : Coronavirus
Next Stories
1 Video : भारतीय महिला क्रिकेटपटूचा धमाकेदार डान्स पाहिलात का?
2 क्रीडाक्षेत्रासाठी अयोग्य काळ!
3 ‘आयपीएल’मधील निवड गुणवत्तेवरून!
Just Now!
X