करोनाच्या तडाख्यामुळे सारं काही सध्या बंद आहे. जगभरात अनेक ठिकाणी लॉकडाउन सुरू आहे. करोनाविरोधात लढा देण्यासाठी भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यातून निधी उभारावा असा सूर पाकिस्तानी क्रिकेटर्सकडून आळवला जात आहे. सुरूवातीला माजी वेगवान गोलंजदाज शोएब अख्तर याने हा प्रस्ताव ठेवला. तडाखेबाज फलंदाज शाहिद आफ्रिदीने त्याला समर्थन दिले. त्यानंतर माजी क्रिकेटपटू आणि लोकप्रिय समालोचक रमीझ राजा यांनीही या प्रस्तावाबाबत सकारात्मकता दर्शवली. पण तसे असले तरी पाकिस्तानच्या संघात प्रतिभावान खेळाडूंनाच स्थान मिळावे, असा आग्रहदेखील त्यांनी धरला आहे.

पाकिस्तानी क्रिकेटपटू म्हणतो, “कुंबळे मला मोठ्या भावासारखा…”

“मॅच फिक्सिंगमध्ये अडकलेल्या अनेक खेळाडूंना पाकिस्तानच्या संघात पुन्हा स्थान मिळाले. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने त्यांच्यावर बंदी घातली होती, पण बंदीचा कालावधी संपल्यावर अनेक खेळाडूंचे संघात पुनरागमन झाले. अशा डागाळलेली प्रतिमा असलेल्या खेळाडूंच्या पुनरागमनाने पाकिस्तानचे क्रिकेट सध्या मरणासन्न अवस्थेत आहे. अशा खेळाडूंना पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने दिलेली सूट आता पाकिस्तान क्रिकेटला भोवली आहे. त्यामुळे मला तर असं वाटतं की अशा डाग लागलेल्या क्रिकेटपटूंनी एकवेळ किराणा मालाचं दुकान टाकावं, पण क्रिकेट अजिबात खेळू नये”, सडेतोड मत रमीझ राजा यांनी व्यक्त केले.

पंतप्रधान मोदींनंतर आफ्रिदीचे आणखी एका भारतीयावर टीकास्त्र, म्हणाला…

भारत-पाक क्रिकेटवर रमीझ राजा म्हणतात…

“क्रिकेटबद्दल भारत आणि पाकिस्तान यांच्यात इतका तणाव का असतो माहिती नाही. क्रिकेटच्या माध्यमातून आपण एकमेकांना चांगल्या पद्धतीने जाणून घेऊ शकतो. भारत-पाकिस्तान क्रिकेट सामने खेळले जायला हवेत. किमान त्या दृष्टीने आता प्रयत्न तरी करायला हवेत. २०१९ च्या विश्वचषक स्पर्धेत भारत-पाकिस्तान सामन्यासाठी सर्वाधिक प्रेक्षकवर्गाची उपस्थिती होती. थेट प्रक्षेपणात देखील हा सामना सर्वाधिक पाहिला गेला. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या साऱ्यांनाच भारत-पाकिस्तान सामने व्हायला हवेत. चाहत्यांनीच आता भारत-पाक सामने तटस्थ ठिकाणी खेळवायचा आग्रह धरायला हवा”, असे मत माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू रमीझ राजा यांनी व्यक्त केले.