करोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे जगभरात भीतीचे वातावरण आहे. लाखो लोकांना करोना व्हायरसचा फटका बसला आहे. प्रत्येक देश आपापल्या परीने या व्हायरसशी झुंज देत आहे. विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. डॉक्टर आणि रूग्णालयातील इतर सहकाऱ्यांच्या अथक परिश्रमामुळे जवळपास लाखभर लोक करोनातून पूर्णपणे बरे झाले असल्याची माहिती आहे. त्यामुळे योग्य ती काळजी आणि उपचार घेतल्यास हा आजार बरा होऊ शकतो, यावर साऱ्यांचा विश्वास असून सर्वत्र जनजागृती केली जात आहे. करोनाचा क्रीडा क्षेत्रालाही फटका बसला असून सर्व क्रीडा स्पर्धा लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. सुरू असलेल्या काही क्रीडा स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत, तर काही स्पर्धा स्थगित करण्यात आल्या आहेत.

…तेव्हाच कळलं होतं भारत लॉकडाउन होणार – रवी शास्त्री

ऑस्ट्रेलिया विरूद्ध न्यूझीलंड यांच्यातील एकदिवसीय मालिका मध्येच स्थगित करण्यात आली. त्यानंतर IPL चे आयोजनही लांबणीवर टाकण्यात आले. त्यामुळे न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन सध्या घरातच आहे. पण क्रिकेटपासून लांब राहणं त्याला फारसं रूचत नाहीये. त्याने नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्या व्हिडीओमध्ये तो त्याचा कुत्रा सँडी याच्यासोबत क्रिकेट खेळत आहे. महत्त्वाचे म्हणजे त्याने व्हिडीओमध्ये जो क्षण शेअर केला आहे, तो अतिशय मजेशीर आहे. विल्यमसन हा उत्तम क्रिकेटपटू आणि फिल्डर आहेच. पण त्याचा कुत्रादेखील सुपर फिल्डर आहे. व्हिडीओमध्ये तोंडाने झकास कॅच घेत त्याने हे सिद्धदेखील केलं आहे.

‘रन आऊट होऊ नका…’; अनोख्या ढंगात जाडेजाने दिला संदेश

हा पाहा व्हिडीओ –

 

View this post on Instagram

 

Sandy in the slips! Any other dogs out there joining Sandy? #caninecordon #daytwoisolation

A post shared by Kane Williamson (@kane_s_w) on

IPL 2020 : “नुसतं शीर्षक नको, पूर्ण बातम्याही वाचत जा”; बेन स्टोक्स चाहत्यावर संतापला…

काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरदेखील आपल्या आप्तेष्टांना फटका बसू नये म्हणून मुलीला स्वच्छतेचे धडे देताना दिसला. आपल्या ५ वर्षांच्या लेकीला टिप्स देतानाचा व्हिडीओ त्याने पोस्ट केला होता. वॉर्नरने इन्स्टाग्रामवर अपलोड केलेल्या व्हिडीओमध्ये मुलीला हात धुण्याचा सल्ला देत होता. करोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी लोकांना आपले हात चांगले धुवावेत आणि घरात रहावे असेही त्याने लोकांना सांगितले.