करोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे जगभरात भीतीचे वातावरण आहे. लाखो लोकांना करोना व्हायरसचा फटका बसला आहे. प्रत्येक देश आपापल्या परीने या व्हायरसशी झुंज देत आहे. विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. डॉक्टर आणि रूग्णालयातील इतर सहकाऱ्यांच्या अथक परिश्रमामुळे काही अंशी लोक करोनातून पूर्णपणे बरे होत आहेत. करोनाचा फटका क्रीडाक्षेत्रालाही बसला असून सर्व क्रीडा स्पर्धा स्थगित करण्यात आल्या आहेत. याच दरम्यान क्रीडाक्षेत्रातून एक वाईट बातमी आली आहे. करोनाची लागण झालेल्या एका महान खेळाडूची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आहे. त्याच्या वडिलांचाही दोन दिवसांपूर्वी करोनानेच मृत्यू झाला होता.

Coronavirus : क्रीडाविश्वावर शोककळा! महान क्रिडापटूचे उपचारादरम्यान निधन

सध्या करोनामुळे रुग्णांचा जगभरातील आकडा हा १४ लाखांपार पोहोचला आहे. तर मृतांचा आकडादेखील दिवसेंदिवस झपाट्याने वाढताना दिसत असून सध्या ८२ हजारांहून अधिक लोकांना आपला प्राण गमवावा लागला आहे. यात सकारात्मक बाब म्हणजे आतापर्यंत सुमारे ३ लाख रूग्ण पूर्णपणे बरेदेखील झाले आहेत. परंतु या दरम्यान क्रीडाक्षेत्रातून करोना संबंधी एक वाईट बातमी आहे.

आधी ५० लाखांची मदत; आता ५,००० लोकांची जबाबदारी… सचिनची करोनाविरोधात जोरदार बॅटिंग

करोनाच्या प्रार्दुभावामुळे आतापर्यंत पाच ते सहा खेळाडूंना प्राण गमवावे लागले आहेत. त्यात बुधवारी आणखी एका खेळाडूची भर पडली. इटलीत एका ऑलिम्पिकपटूचा मृत्यू झाला. इटलीचे माजी ऑलिम्पिक धावपटू दोनातो साबिया यांचे निधन झाले. ते ५६ वर्षांचे होते.

इटालियन ऑलिम्पिक समितीने (कोनी) दोनातो यांच्या निधनाची बातमी दिली. पोटेन्झा येथील सॅन कार्लो रूग्णायलात अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र दुर्दैवाने त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. दुर्दैव म्हणजे काहीच दिवसांपूर्वी करोनाच्या तडाख्याने त्यांच्या वडिलांचेही निधन झाले होते.

काही दिवसांपूर्वी करोनाची लागण झालेले स्वित्झर्लंडचे दिग्गज आईस हॉकीपटू रॉजर चॅपट यांचे निधन झाले होते.