18 January 2021

News Flash

इशांतने दिलं चॅलेंज, विराटने दिला मजेशीर रिप्लाय

आव्हान देणारा इशांतच झाला ट्रोल; चाहत्यांना हसू अनावर

करोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे जगभरात भीतीचे वातावरण आहे. सुमारे दोन लाखांहून अधिक लोकांना करोनाचा फटका बसला आहे. प्रत्येक देश आपापल्या परीने या व्हायरसशी झुंज देत आहे. विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. करोनाचा फटका क्रीडा विश्वालाही बसला असून बहुतांश क्रीडास्पर्धा रद्द झाल्या आहेत. भारतात धर्म मानल्या जाणाऱ्या क्रिकेटच्या स्पर्धादेखील काही काळ स्थगित करण्यात आल्या असून IPL चे आयोजन लांबणीवर ढकलण्यात आले आहे. सर्व क्रिकेटपटू चाहत्यांना घरी बसण्याचे आणि सावधनता बाळगण्याचा सल्ला देत आहेत. या दरम्यान, टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज इशांत शर्माने एक व्हिडीओ पोस्ट करून इतरांना चॅलेंज दिले, पण विराटच्या एका कमेंटमुळे इशांत स्वत:च ट्रोल झाल्याचे दिसले.

क्रिकेटच्या मैदानावरील सौंदर्यवती… सिनेतारकाही पडतील मागे!…

इशांतने एक व्हिडीओ पोस्ट केला. त्यात त्याने एक विचित्र अशी वेशभूषा करत व्हिडीओ पाहणाऱ्यांना चॅलेंज दिले.

पाहा व्हिडीओ –

या व्हिडीओमध्ये इशांत शर्माने घरात राहण्याचा सल्ला साऱ्यांना दिला आणि स्वत:देखील त्याचे काटेकोर पालन केले. त्याचसोबत तो म्हणाला की मला माझ्या मित्राने बंद दाराआड क्रिकेट खेळण्याचे आव्हान दिले आहे. असे म्हणून इशांतने पॅड्स, ग्लोव्ह्ज, हेल्मेट सारं काही घातलं पण त्यानंतर मात्र त्याने पुस्तकातील क्रमांकावरून क्रिकेट खेळायला सुरूवात केली. त्याने पहिल्या २ संधीमध्ये १६ धावा केल्या पण तिसऱ्या संधीत तो बाद झाला.

‘टीम इंडिया’च्या स्टार खेळाडूला एलिस पेरीसोबत हवी ‘डिनर डेट’

त्याचा हा व्हिडीओ चाहत्यांना मजेशीर पद्धतीने सादर झाल्याने नक्कीच पसंत आला. पण विराटने त्या व्हिडीओवर कमेंट केल्याने इशांत चांगलाच ट्रोल झाला. विराटने काय रिप्लाय दिला पाहा…

दरम्यान, लोकेश राहुलनेही त्याला रिप्लाय दिला होता. पण त्याने राहुलला पुन्हा रिप्लाय देत गप्प केलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 17, 2020 2:00 pm

Web Title: coronavirus lockdown virat kohli hilariously troll ishant sharma on his new video kl rahul also enjoys commenting amid covid 19 vjb 91
टॅग Coronavirus
Next Stories
1 सलमान की धोनी निवड करणं म्हणजे आई की बाबा या प्रश्नाचं उत्तर देण्यासारखं – केदार जाधव
2 ‘टीम इंडिया’च्या स्टार खेळाडूला एलिस पेरीसोबत हवी ‘डिनर डेट’
3 ट्वेन्टी-२० विश्वचषक होणारच!
Just Now!
X