News Flash

विराटने ‘हा’ फोटो पोस्ट करत उडवली पुजाराची खिल्ली

पुजाराने दिलं 'स्मार्ट' उत्तर, बघा काय म्हणाला...

करोना नावाच्या विषाणूमुळे सध्या सांर जग त्रस्त आहे. प्रत्येक देश आपापल्या परीने या व्हायरसशी झुंज देत आहेत आणि उपाययोजना करण्यात येत आहेत. करोनाचा फटका क्रीडा विश्वालाही बसला असून बहुतांश क्रीडा स्पर्धा रद्द झाल्या आहेत. अशा परिस्थितीत करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सर्व क्रिकेटपटू चाहत्यांना घरी बसण्याचे आवाहन करत आहेत. घरबसल्या काही क्रिकेटपटू पूर्णपणे आपल्या कुटुंबाला वेळ देत आहेत, तर काही क्रिकेटपटू सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह आहेत.

‘विराट म्हणजे…’; पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूचं रोखठोक मत

सारे खेळाडू सध्या घरातच आहे. घरातून बाहेर निघू नये असे सांगण्यात आल्यामुळे खेळाडू मैदानावरदेखील सरावासाठी जाऊ शकत नसल्याचे चित्र आहे. पण नियोजित वेळापत्रकापेक्षा जास्त विश्रांती मिळाल्याने आता सर्व खेळाडूंना क्रिकेट खेळायला जाण्याची इच्छा होऊ लागली आहे. त्यातच भारताचा कर्णधार विराट कोहली याने एक खास फोटो शेअर करत कसोटीपटू चेतेश्वर पुजाराची खिल्ली उडवली आहे. विराटने पोस्ट केलेल्या फोटोमध्ये विराट दुसऱ्या स्लीपमध्ये तर पुजारा पहिल्या स्लीपमध्ये फिल्डिंग करत आहे. फोटोमध्ये विराट हात लांब करून चेंडू झेलण्याच्या प्रयत्नात आहे. त्या फोटोचा आधार घेऊन त्याने पुजाराला प्रश्न केला आहे की लॉकडाउन नंतर पहिल्या सत्रात असा झेल आला तर तू प्रयत्न करशील का? आणि पुढे दोन चिडवण्याचे ईमोजी वापरले आहेत.

VIDEO : टिकटॉक व्हिडीओ सुरू असतानाच आवाज आला, “नको… नाही…”

 

View this post on Instagram

 

First session after lockdown be like @cheteshwar_pujara I hope you will go for the ball pujji

A post shared by Virat Kohli (@virat.kohli) on

सचिन म्हणतो, “…तेव्हा वाटलं ‘सोशल डिस्टन्सिंग’ गेलं खड्ड्यात”

त्यावर पुजारानेही स्मार्ट उत्तर दिले आहे. “मी चेंडू झेलण्याच्या नक्की प्रयत्न करेन पण फक्त माझे प्रयत्न दोन हातांनी असतील”, असे पुजाराने कमेंटमध्ये म्हटले आहे.

ना धोनी, ना युवराज, ना गंभीर… या खेळाडूमुळे जिंकलो विश्वचषक – सुरेश रैना

दरम्यान, भारतीय संघाचा यंदाच्या वर्षाअखेरीस ऑस्ट्रेलिया दौरा नियोजित आहे. पण करोनाच्या संकटामुळे या वर्षअखेरीस होणारी भारताविरुद्धची कसोटी आणि ट्वेन्टी २० मालिका रद्द करण्यात येऊ शकते आणि असे झाले तर ऑस्ट्रेलिया संघातील खेळाडू उद्ध्वस्त होतील, अशी भीती ऑस्ट्रेलियाचा अव्वल फलंदाज मार्नस लबूशेनने काही दिवसांपूर्वी व्यक्त केली. भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला ऑक्टोबर महिन्यात ट्वेन्टी-२० मालिकेद्वारे सुरुवात होणार आहे. तसेच चार सामन्यांच्या कसोटी मालिकेनंतर डिसेंबरमध्ये या दौऱ्याची सांगता होणार आहे; पण प्रवासावरील निर्बंध आणि करोनाचा संसर्ग कधी आटोक्यात येईल, याची कोणतीही शाश्वती नसल्यामुळे या दौऱ्याच्या आयोजनाविषयी साशंकता निर्माण झाली आहे. या दौऱ्यादरम्यान १८ ऑक्टोबरपासून ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होत असून या प्रतिष्ठेच्या स्पर्धेविषयीही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 6, 2020 12:07 pm

Web Title: coronavirus lockdown virat kohli teases cheteshwar pujara with catch in slips photo pujara reply brilliantly vjb 91
Next Stories
1 अश्विनच सर्वोत्तम ऑफ स्पिनर – हरभजन
2 ‘हा’ संघ ठरू शकतो ‘विराटसेने’साठी डोकेदुखी – रवी शास्त्री
3 ‘विराट म्हणजे…’; पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूचं रोखठोक मत
Just Now!
X