करोनाच्या तडाख्यामुळे जगभरात भीतीचे वातावरण आहे. लाखो लोकांना करोना व्हायरसचा फटका बसला आहे. प्रत्येक देश आपापल्या परीने या व्हायरसशी झुंज देत आहेत. विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. डॉक्टर आणि रूग्णालयातील इतर सहकाऱ्यांच्या अथक परिश्रमामुळे बहुतांश लोक करोनातून पूर्णपणे बरे झाले आहेत. करोनामुळे नुकसान झालेल्या लोकांसाठी विविध स्तरातून मदतीचा हात पुढे केला जात आहे. या दरम्यान क्रिकेटपटूंनी आपल्या मानधनातील अर्धे मानधन करोनाग्रस्तांसाठी दान करण्याचा निर्णय घेतला आहे.

‘हम तुम एक कमरे में बंद हो’… पाहा हार्दिक-नताशाचा ‘लॉकडाउन’ स्पेशल फोटो

बांगलादेश क्रिकेट संघातील २७ क्रिकेटपटूंनी करोना व्हायरस विरोधात लढण्यासाठी आपले अर्धे मानधन दान करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात एकदिवसीय क्रिकेट संघाचा कर्णधार तमीम इकबाल, मुश्फीकूर रहीम या दिग्गज खेळाडूंचाही समावेश आहे. बुधवारी एक बैठक घेण्यात आली. त्या नंतर बांगलादेश क्रिकेट मंडळाचे दिग्दर्शक आणि संघ व्यवस्थापक सब्बीर यांनी माहीती दिली की खेळाडूंनी अर्धे मानधन दान केल्याने एकूण मिळून ३१ लाख रूपये जमा होणार आहेत. बांगलादेशात करोनाचा प्रभाव वाढताना दिसतो आहे. आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्व नागरिकांना जागृत करण्याचे प्रयत्न करत आहोत. आम्ही २७ क्रिकेटपटूंनी महिन्याचे अर्धे मानधन मदत म्हणून देण्याचे ठरवले आहे, असे तमीम इकबालन सांगितले.

विनाकारण रस्त्यावर भटकणाऱ्यांसाठी सचिनचा खास संदेश, म्हणाला…

CoronaVirus : “विराट, सचिन.. लाज वाटते की नाही..?”; नेटिझन्सचा सोशल मीडियावर संताप

सध्याच्या घडीला भारतासह संपूर्ण जग करोना विषाणूविरोधात लढत आहे. भारताचा शेजारी देश पाकिस्तानमध्येही करोनामुळे हालाकीची परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी आपली जबाबदारी ओळखत गरजू व्यक्तींना मोफत अन्नधान्याचे वाटप करत आहे. तो त्यासंदर्भातील फोटो आणि अपडेटदेखील ट्विटरवरून साऱ्यांना देत आहे. आफ्रिदीकडून केली जात असलेली मदत पाहून भारतातील क्रिकेटप्रेमी आणि नेटिझन्स यांच्याकडून सचिन तेंडुलकर, विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे.