22 January 2021

News Flash

ज्वाला गुट्टाला आली बॉयफ्रेंडची आठवण; त्याने दिला झकास रिप्लाय

मधल्या काळात ज्वालाचं क्रिकेटपटू अझरूद्दीनसोबत अफेअर असल्याच्या चर्चा

करोनाच्या फैलावामुळे सध्या जगभरात भीतीचे वातावरण आहे. लाखो लोकांना करोना व्हायरसचा फटका बसला आहे. प्रत्येक देश आपापल्या परीने या व्हायरसशी झुंज देत आहे. करोनाचा क्रीडा क्षेत्रालाही फटका बसला असून सर्व क्रीडा स्पर्धा लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. सुरू असलेल्या काही क्रीडा स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत, तर काही स्पर्धा स्थगित करण्यात आल्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाउनची घोषणा केल्याने देशांतर्गत होणाऱ्या सर्व खेळांसह बॅडमिंटनच्या स्पर्धांनाही अल्पविराम लागला आहे. त्यामुळे भारताची ग्लॅमरस बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टा ही सध्या घरात बसून आहे. मधल्या काळात ज्वालाचं क्रिकेटपटू अझरूद्दीनसोबत अफेअर असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. पण सध्या ती घरी असताना तिचा बॉयफ्रेंड अभिनेता विष्णू विशाल तिच्याबरोबर नाही. त्यामुळे तिला त्याची खूपच आठवण येत आहे. नुकतेच ज्वालाने एक ट्विट केले. त्या ट्विटमध्ये तिने तिचे विष्णू विशालसोबतचे काही एकांतातील फोटो पोस्ट केले आणि तुझी आठवण येते असे लिहिले.

ज्वालाच्या या ट्विटला बॉयफ्रेंड विष्णूनेही झकास रिप्लाय दिला. “सध्या सारं ठीक आहे. पण आता Social Distancing गरजेचं आहे. त्यामुळे आपण सगळ्यांच्या चांगल्या आयुष्यासाठी प्रार्थना करूया”, असे ट्विट त्याने केले आणि मिठी मारण्याचा इमोजीही त्यात वापरला.

दरम्यान, करोनाचं संकट उद्भवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करत लॉकडाउनची घोषणा केली. करोनासारख्या महारोगाने जगातील सामर्थ्यशाली राष्ट्रांनाही हतबल करून ठेवलं आहे. त्यामुळे संपूर्ण देश लॉकडाउनमध्ये जात आहे, अशी घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केली. मोदी यांच्या घोषणेआधीच देशातील अनेक राज्य लॉकडाउनमध्ये गेली होती. करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी महाराष्ट्रासह काही राज्यांमध्ये संचारबंदीही लागू करण्यात आली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 30, 2020 9:06 am

Web Title: coronavirus outbreak lockdown in india jwala gutta misses boyfriend vishnu vishal he gives romantic reply vjb 91
टॅग Coronavirus
Next Stories
1 ऑलिम्पिक पुढील वर्षी उन्हाळ्यात?
2 भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा अडचणीत
3 करोनाविरुद्ध लढय़ासाठी हिदर नाइट राष्ट्रीय आरोग्य सेवेत
Just Now!
X