News Flash

जिंकलंस भावा… ऑक्सिजन पुरवठ्यासाठी ऑस्ट्रेलियन खेळाडूने PM Cares निधीला दिले ३७ लाख रुपये

हा खेळाडू यंदा आयपीएलमध्ये कोलकात्याच्या संघाकडून खेळतोय

पॅट कमिन्स

एकीकडे भारतामध्ये करोनाच्या दुसऱ्या लाटेनं हाहाकार माजवला असताना दुसरीकडे इंडियन प्रिमियर लिग म्हणजेच आयपीएल ही स्पर्धा खेळवली जात असल्याच्या मुद्द्यावरुन आता हळूहळू सोशल मीडियावर चर्चा रंगू लागली आहे. आयपीएलच्या आयोजनासंदर्भात प्रश्न चिन्ह निर्माण होत असतानाच आयपीएलमध्ये सहभागी झालेल्या एक परदेशी खेळाडूने सामाजिक भान जपत भारतातील ऑक्सिजनच्या पुरवठ्याची समस्या सोडवण्यासाठी ५० हजार डॉलर म्हणजेच ३७ लाख ३६ हजार रुपये पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी दिले आहेत. कोलकाता नाईट रायडर्ससाठी खेळणारा ऑस्ट्रेलियन संघातील जलद गती गोलंदाज पॅट कमिन्सने ही मदत केली आहे.

कमिन्सने यासंदर्भात एक मोठा मेसेज लिहिला असून त्याने आपल्याला भारत अतिशय आवडता देश असून मी माझ्या आयुष्यातील काही सर्वात चांगल्या लोकांना या देशात भेटल्याचं म्हटलं आहे. तसेच या संकटाच्या काळामध्ये आयपीएलसारख्या स्पर्धांच्या आयोजनामधून देशातील लोकांना थोडा विरंगुळा मिळेल असा सरकारचा या स्पर्धेच्या आयोजनाला परवानगी देण्यामागील दृष्टीकोन असल्याचंही कमिन्सनने म्हटलं आहे. इतकच नाही तर कमिन्सने आयपीएलमध्ये खेळणाऱ्या जगभरातील इतर खेळाडूंनीही पुढाकार घेत या संकटाच्या काळामध्ये मदत निधी द्यावा आणि मदतीसाठी पुढे यावं असं आवाहन केलं आहे.

तसेच लोकांनी आपल्या भावानांना योग्यपद्धतीने वापरु त्याचा कामामध्ये वापर केल्यास बदल नक्की घडले आणि या परिस्थितीवर मात करणं शक्य होईल असंही कमिन्स म्हणाला आहे. मी केलेली मदत फार नाहीय पण त्यामुळे काही लोकांच्या आयुष्यात नक्कीच बदल घडेल अशी मला आशा आहे, असंही कमिन्सने या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

कमिन्सने केलेल्या या या ट्विटनंतर सर्वच स्तरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे. सोशल नेटवर्किंगवर त्याचं ट्विट व्हायरल झालं असून ३८ हजार जणांनी ते रिट्विट केलं आहे. एक लाखांहून अधिक जणांनी ते लाईक केलं असून हजारो लोकांनी त्यावर कमेंट करत कमिन्सने केलेल्या मदतीसाठी त्याचे आभार मानले आहेत. अनेकांनी कमिन्सकडून इतर खेळाडूंनी प्रेरणा घेण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 26, 2021 5:03 pm

Web Title: coronavirus pat cummins donates usd 50000 to pm cares relief fund for oxygen supplies to india scsg 91
टॅग : Coronavirus,IPL 2021
Next Stories
1 “मोदी स्टेडियमवर आज राहुल खेळणार”, जाफरचं गमतीशीर ट्विट होतंय व्हायरल
2 शो मस्ट गो ऑन! आयपीएलबाबत बीसीसीआयचं स्पष्टीकरण
3 करोनाच्या भीतीने ऑस्ट्रेलियाचे खेळाडू सोडणार IPL स्पर्धा?
Just Now!
X