भयंकर अशा करोना व्हायरसमुळे लाखो लोकांना फटका बसला आहे. प्रत्येक देश आपापल्या परीने या व्हायरसशी झुंज देत आहे. विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. करोनाचा फटका क्रीडा विश्वालाही बसला असून बहुतांश क्रीडा स्पर्धा रद्द झाल्या आहेत. भारताचा शेजारी देश पाकिस्तानलादेखील याचा फटका बसला आहे. त्यामुळे पाकिस्तानातही विविध स्तरातून मदत केली जात आहे.

चहलचं टोपणनाव माहिती आहे का?

करोनाच्या तडाख्या दरम्यान पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने क्रिकेट विश्वाशी संबंधित असलेल्या खेळाडू, सहकारी, पंच वर्ग तसेच मैदानावरील कर्मचारी यांना आर्थिक मदत जाहीर केली आहे. करोनामुळे सगळीकडेच गरीब आणि गरजू लोकांचे हाल होताना दिसत आहेत. अशा परिस्थितीमध्ये पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने त्यांच्या कर्मचारी वर्गासाठी आर्थिक मदत जाहीर केली आहे. बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार, प्रथम श्रेणी खेळाडूंना २५ हजारांची मदत देण्यात येणार आहे. त्या सह पंच आणि समानाधिकारी वर्गातील लोकांना २० हजार आणि मैदानाची निगा राखणाऱ्या ग्राऊंड स्टाफला १० हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

विराटला गोलंदाजी की बुमराहसमोर फलंदाजी? महिला क्रिकेटपटूने दिलं हे उत्तर

सर्व लोकांना ही आर्थिक मदत ईद सणाच्या आधी दिली जाणार असून ही मदत कोणाकोणाला दिली, याबाबत पूर्णपणे गोपनीयता पाळण्यात येणार आहे, असेही पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

टीम इंडियाचं प्रशिक्षक व्हायचंय – शोएब अख्तर

क्रिकेट बोर्डाकडून ही एक रकमी करण्यात येणारी आर्थिक मदत किती लोकांना आणि कशी केली गेली, याबाबत कोणत्याही प्रकारची घोषणा किंवा माहिती देण्यात येणार नाही, असेही बोर्डाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

“धोनीने जे केलं, तेच विराट, रोहितने करावं”

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने करोनाशी लढण्यासाठी पंतप्रधान सहाय्यता निधीमध्ये १० मिलियनची मदत जमा केली आहे. तसेच, शाहिद आफ्रिदी, अझर अली, रुमान रईस, सर्फराज अहमद आणि इतर क्रिकेटपटूंनी वैयक्तिक पातळीवर केलेल्या मदतीचेही बोर्डाचे अध्यक्ष एहसान मणी यांनी कौतुक केले आहे.