भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळवली जाणारी तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका करोना व्हायरसच्या धसक्याने रद्द करण्यात आली. मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. त्यानंतर करोना संदर्भात खबरदारीचा उपाय म्हणून पुढील दोन्ही सामने रद्द करण्यात आले. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेचा संघ कोलकाता विमानतळावरून दुबईमार्गे स्वदेशी परतला. मायदेशात दाखल झाल्यानंतर या संघाला सुरक्षित अंतर राखून विलगीकरण करून राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

“धोनीचं ‘कमबॅक’ आता जरा कठीणंच आहे”

दक्षिण आफ्रिकेत अद्याप करोना व्हायरसचा फारसा प्रादुर्भाव झालेला नाही. योग्य वेळी घेतलेल्या खबरदारीमुळे आफ्रिकेत हा व्हायरस बळावलेला नाही. पण भारतात मात्र या व्हायरसने थैमान घातले असून या रोगाची लागण झालेल्याच्या संपर्कात येणेदेखील धोक्याचे आहे. तशातच आफ्रिकेचा संघ आधी धरमशाला नंतर कोलकाता असे करत थेट दुबईमार्गे दक्षिण आफ्रिकेत परतले. भारतात आणि दुबईत या व्हायरसचा चांगलाच फटका बसला असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून आफ्रिकन क्रिकेटपटूंना काही दिवस सामान्य जनजीवनापासून लांब राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

CoronaVirus : IPL 2020 आणखी लांबणीवर; आता एप्रिलऐवजी ‘या’ महिन्यात आयोजन?

दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. शुऐब मांजरा यांनी माहिती दिली की भारतात दाखल झालेल्या खेळाडूंना स्वत:ला विलगीकरण करून राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यापैकी कोणाला करोना व्हायरसची लागण झाल्याचा संशय़ आला तर त्यांनी लगेच चाचणी करण्यात येणार आहे. भारताविरूद्धच्या मालिकेसाठी आफ्रिकेच्या संघात क्विंटन डी कॉक (कर्णधार आणि यष्टीरक्षक), टेंबा बावुमा, रासी वॅन डर डसन, फाफ डु प्लेसिस, कायल वेरिन, हेन्रीच क्लासें, डेव्हिड मिलर, जॉन-जॉन स्मट्स, अँडिल फेलुक्वायो, लुंगी एनगीडी, लुथो सिपाम्ला, ब्युरॉन हेंडरिक्स, एनरिच नॉर्ये, जॉर्ज लिंड, केशव महाराज या खेळाडूंचा समावेश होता.