News Flash

‘करोना’मुळे चीनमधील क्रीडा स्पर्धा धोक्यात

हाँगकाँग : चीनमध्ये ‘करोना’ विषाणू संसर्गाने थैमान घातल्यामुळे अनेक महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता जागतिक इन्डोअर अ‍ॅथलेटिक्स स्पर्धा आणि विश्वचषक स्किईंग

हाँगकाँग : चीनमध्ये ‘करोना’ विषाणू संसर्गाने थैमान घातल्यामुळे अनेक महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता जागतिक इन्डोअर अ‍ॅथलेटिक्स स्पर्धा आणि विश्वचषक स्किईंग स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्यानंतर गुरुवारी चीनमधील फुटबॉलचे सर्व सामने रद्द करण्यात आले.

जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या चीनने गेल्या काही वर्षांत आंतरराष्ट्रीय स्पर्धाच्या आयोजनात मुसंडी मारली आहे. पण ‘करोना’ विषाणू संसर्गामुळे आता क्रीडा स्पर्धाचे वेळापत्रक धोक्यात आले आहे. चायनीज फॉम्र्युला-वन शर्यतीपुढेही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

‘‘चीनमधील ऑटोमोबाइल स्पोर्ट्स महासंघ तसेच संयोजक आणि फॉम्र्युला-वन संघटनेसह आम्ही चीनमधील परिस्थितीवर नजर ठेवून आहोत. सध्या तरी शर्यतीच्या आयोजनाबाबत आम्ही काहीच भाष्य करू शकत नाही. मात्र संबंधित यंत्रणेकडून अहवाल मिळाल्यानंतरच आम्ही याविषयी प्रतिक्रिया देऊ,’’ असे जागतिक ऑटोमोबाइल असोसिएशनकडून (फिया) स्पष्ट करण्यात आले.

चीनमधील स्पर्धाची सद्य:स्थिती

आगामी स्पर्धा  तारीख  सद्य:स्थिती

चीन सुपर लीग फुटबॉल  २२ फेब्रुवारीपासून पुढे ढकलली

जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धा       १३ ते १५ मार्च  लांबणीवर

चॅम्पियन्स लीग फुटबॉलचे सामने  फेब्रुवारी, मार्च   अन्य देशात

ऑलिम्पिक पात्रता महिला फुटबॉल ३ ते ९ फेब्रुवारी  सिडनीला

ऑलिम्पिक पात्रता बॉक्सिंग स्पर्धा  ३ ते १४ फेब्रुवारी जॉर्डनला

महिला बास्केटबॉल ऑलिम्पिक पात्रता      ६ ते ९ फेब्रुवारी  बेलग्रेडला

जागतिक अ‍ॅक्वेटिक्स मालिका   ७ ते ९ मार्च    रद्द

हैनान प्रो टूर सायकलिंग  २३ फेब्रुवारीपासून रद्द

आशियाई कुस्ती ऑलिम्पिक पात्रता २७ ते २९ मार्च  रद्द

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 31, 2020 12:31 am

Web Title: coronavirus sporting events in china under threat as virus spreads zws 70
Next Stories
1 “RCB ने वगळलं तेव्हा खूप वाईट वाटलं होतं, विराटने तर मला तोंडावर स्पष्ट सांगितलं होतं की….”
2 न्यूझीलंड दुखापतीमुळे हैराण, तीन नवख्या खेळाडूंना संधी
3 “सुपर ओव्हरमध्ये फलंदाजीची वेळ आली तेव्हा मला…”; रोहित शर्माने सांगितला मजेदार किस्सा
Just Now!
X