05 March 2021

News Flash

करोनानं टोक्यो ऑलिम्पिकला लावला ब्रेक

ऑलिम्पिक रद्द करणे हा निश्चित पर्याय नाही

करोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे टोक्यो ऑलिम्पिकला वर्षभराचा ब्रेक लागला आहे. २४ जुलै २०२० पासून रंगणारी प्रतिष्ठेची टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा वर्षभरानं पुढे ढकलली आहे. आता ही स्पर्धा पुढील वर्षी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. स्पर्धेच्या आयोजनाबाबत पुढील काही दिवसांमध्ये घोषणा करूयात. सध्या करोनाच्या प्रदुर्भावापासून वाचण्यासाठी सर्वांचा लढा सुरू आहे. सर्वजण मिळून करोनावर मात करू असं आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे सदस्य डिक पौंड यांनी सांगितले.

करोना विषाणू संसर्गामुळे टोक्यो ऑलिम्पिकवर पुढील वर्षीही टांगती तलवार असल्याचं तज्ञ्जांच म्हणणं आहे. अमेरिका, न्यूझीलंड कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया यांनी जुलैमध्ये होणाऱ्या टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेतून माघार घेतली होती. प्रमुख संघांनी स्पर्धेतून माघार घेतल्यानंतर समितनं ऑलिम्पिक स्पर्धा पुढे ढकलल्याचं तज्ञ्जांच मत आहे. टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धा पुढे ढकलली जाऊ शकते, पण रद्द होऊ शकत नाही, असे स्पष्टीकरण आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे (आयओसी) अध्यक्ष थॉमस बाख यांनी दिले आहे.

ऑलिम्पिकपेक्षा माणसांचे आयुष्य महत्त्वाचे आहे. प्रत्येक दिवसाचा आढावा आम्ही घेत आहोत. या स्थितीत ऑलिम्पिकच्या तारखेबाबत इतक्या लगेचच अंतिम निर्णय घेण्यात येणार नाही. त्यासाठी किमान चार आठवडे लागतील. ऑलिम्पिक रद्द करणे हा निश्चित पर्याय नाही. रद्द करण्याच्या दृष्टीने आम्ही कोणतीच चर्चा करत नाही, असं थॉमस बाख म्हणाले.

करोना व्हायरसच्या प्रदुर्भावामुळे जगभरात आतापर्यंत १७ हजारांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं या आजाराला महामारी घोषीत केलं आहे. ऑलिम्पिक स्पर्धेसाठी जापानमधील मैदान आधीच तयार झाली होती. मोठ्या प्रमाणात तिकिटांची विक्रीही झालेली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 24, 2020 7:21 pm

Web Title: coronavirus tokyo olympics postponed for one year tokyo olympics nck 90
टॅग : Coronavirus
Next Stories
1 पठाण बंधूंनी राखलं सामाजिक भान ! गरजूंना मोफत मास्कचं वाटप
2 CoronaVirus : जादूगार अय्यर ! होम क्वारंटाईन झालेल्या श्रेयसने जोपसली नवीन कला
3 करोनाविरुद्ध लढा : हे दिवसही जातील ! सौरव गांगुलीने व्यक्त केला आशावाद
Just Now!
X