News Flash

CoronaVirus : टीम इंडियाच्या मानधनातही होणार कपात?

वाचा काय म्हणतंय BCCI?

देशभरात पसरलेल्या करोना विषाणूशी लढण्यासाठी केंद्र आणि संबंधित राज्य सरकारच्या यंत्रणा कसोशीने प्रयत्न करत आहेत. मात्र या रोगावर अद्याप औषध सापडलं नसल्यामुळे जगभरातील देशांमधील वैज्ञानिकांचे प्रयत्न सुरु आहेत. सध्याच्या काळात करोना बाधित रुग्णांची काळजी घेण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने विशेष पॅकेज जाहीर केलं आहे.

युवराजचा धोनी, कोहलीवर खळबळजनक आरोप, म्हणाला…

BCCI ने देखील पंतप्रधान मदत निधीमध्ये ५१ कोटींचा निधी जमा केला आहे. तसेच अनेक आजी माजी क्रिकेटपटूंनी करोनाग्रस्तांसाठी पुढाकार घेऊन आर्थिक सहाय्य केले आहे. तशातच आता टीम इंडियाच्या खेळाडूंच्या मानधनात कपात करण्यात येऊ शकते, असे संकेत भारतीय क्रिकेटपटूंच्या संघटनेचे अध्यक्ष अशोक मल्होत्रा यांनी दिले आहेत.

आफ्रिदीचं कौतुक करताच नेटक-यांनी भज्जी, युवीला घेतलं फैलावर

जगभरात करोना विषाणूमुळे हाहा:कार माजला आहे. खेळाच्या सर्व स्पर्धा आणि नियोजित वार्षिक वेळापत्रक कोलमडले आहे. क्रिकेटविश्वालाही करोनाचा मोठा फटका बसल्याचे चित्र आहे. नुकतीच रद्द झालेली भारत-आफ्रिका वन डे मालिका आणि लांबणीवर पडलेले IPL चे आयोजन यामुळे BCCI ला मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसानाचा सामना करावा लागतो आहे. त्यामुळे करारबद्ध खेळाडूंनी आपल्या मानधनात कपात केली जाऊ शकते, यासाठी तयार राहावे, असे मल्होत्रा म्हणाले.

CoronaVirus : रविंद्र जाडेजाच्या पत्नीने केली २१ लाखांची मदत

मल्होत्रा म्हणाला की, BCCI ही भारतीय क्रिकेटची सर्वोच्च संस्था आहे. BCCI ही एक कंपनी आहे त्यामुळे BCCI ला नुकसान झाल्यास त्याचा परिणाम खेळाडू आणि इतर कर्मचारी वर्गावर होणं स्वाभाविक आहे. युरोपातील सारेच महागडे फुटबॉलपटू मानधनात कपात करताना दिसत आहेत. त्यांच्या क्लब आणि फुटबॉल मंडळांकडून तसे सांगण्यात आले आहे.

CoronaVirus : रैनाने दिला मदत निधी, त्यावर पंतप्रधान मोदी म्हणतात…

“करोनाचा तडाखा हे अनपेक्षित चित्र आहे. सध्या कसोटीचा काळ आहे. त्यामुळे साऱ्यांनी आपल्या खिशातून दान करायला हवे. खेळाडूंच्या मानधनात थेट कपात करणे योग्य नाही हे मान्य आहे पण जर BCCI ला आर्थिक फटका बसला असेल तर त्याचा परिणाम क्रिकेटपटूंनाही भोगावा लागणारच”, असे मल्होत्रा यांनी स्पष्ट केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 1, 2020 1:48 pm

Web Title: coronavirus virat kohli led team india may face pay cut due to covid 19 pandemic vjb 91
टॅग : Coronavirus
Next Stories
1 पाकिस्तानातील हिंदूंसाठी शाहिद आफ्रिदी सरसावला, गरजू व्यक्तींना केलं अन्नदान
2 युवराजचा धोनी, कोहलीवर खळबळजनक आरोप, म्हणाला…
3 CoronaVirus : रविंद्र जाडेजाच्या पत्नीने केली २१ लाखांची मदत
Just Now!
X